Eknath Shinde | “24 मिनिटात त्यांनी काय पाहणी केली?”, शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल

Eknath Shinde | मुंबई :  अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे खूप नुकसान झाले आहे. याची पाहणी करण्याकरीता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काल मराठवाडा (Marathwada) दौऱ्यावर होते. यावरून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे श्रीरंग बारणे

उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर फक्त 24 मिनिटं होते. या 24 मिनिटात त्यांनी काय पाहणी केली?, असा खोचक सवाल करत श्रीरंग बारणे यांनी उद्धव ठाकरे यांना चांगलंच लक्ष्य केलं आहे. श्रीरंग बारणे यांनी प्रसार माध्यमांशी सवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

कोणताही पक्ष असावा राज्यातील जनता सुखी व्हावी हा हे सरकारचं काम आहे. ते काम हे सरकार करत आहे. बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार सत्तेत आहे. भाजपसोबत आहे. त्यामुळे हे सरकार निश्चित जनतेच्या समस्या सोडवण्यात यशस्वी होईल, असा विश्वासही बारेणे यांनी व्यक्त केला आहे.

तसेच, धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार? असा सवाल श्रीरंग बारणे यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना  धनुष्यबाण मिळावं यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कायदेशीर लढाई लढत आहे. धनुष्यबाण चिन्हं हे बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेलाच मिळेल, असा दावा त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.