Eknath Shinde | CM शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक! मंत्रिमंडळात शिंदे गटाच्या आमदारांना मिळणार जागा?

Eknath Shinde | मुंबई: खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काल एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाचा तिढा सुटला असल्याचं बोललं जात आहे.

आज दुपारपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटातील आमदारांची तातडीने वर्षा निवासस्थानी बैठक बोलावली आहे.

Cabinet expansion is likely to take place today or tomorrow

अमित शाह यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडी वेग धरला आहे. आज किंवा उद्या कोणत्या क्षणी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं बोललं जात आहे. यामध्ये शिंदे गटातील चार आमदारांना मंत्रिपद दिलं जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या आमदारांना मुंबईतच राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री शिंदेंनी आज सकाळी दहा वाजता वर्षा निवासस्थानी आमदारांची बैठक बोलावली आहे.

शिंदे गटातील (Eknath Shinde) अनिल बाबर (Anil Babar), भरत गोगावले (Bharat Gogawale), योगेश कदम (Yogesh Kadam) यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्याचबरोबर संजय शिरसाट (Sanjay Shirsat) आणि संजय रायमुलकर (Sanjay Raimulkar) या दोघांपैकी एकाला मंत्रिमंडळात समाविष्ट होण्याची संधी मिळणार आहे.

शिंदे गटातील फक्त चार मंत्र्यांना मंत्रिमंडळात जागा मिळणार असल्याने शिंदे गटातील बाकी आमदारांचा हिरमोड होण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) आणि बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना फोन करून मुंबईत येण्यास सांगितले होते.

शहाजीबापू पाटील मुंबई दाखल झालेले असून आमदार बच्चू कडू मुंबईत आलेले नाही. आमदार बच्चू कडू नाराज असून सकाळी 11 वाजता ते आपला निर्णय जाहीर करणार असल्याचं बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/44mej7b