EKNATH SHINDE | मुंबई : महाराष्ट्र शिंदे – फडणवीस सरकार स्थापन होऊन अकरा महिने झाले आहेत. एकबाजूला अजूनही मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) रखडलेलं पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटाचे ( Eknath Shinde Team) खासदार गजानन कीर्तिकर ( Gajanan Kirtikar) यांनी खळबळजनक विधान केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
भाजप आम्हांला सावत्रपणाची वागणूक देत आहे –
गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपबद्दल ( BJP) मोठं वक्तव्य केलं आहे. गजानन कीर्तिकर ( Gajanan Kirtikar) म्हणाले की, आम्ही 13 खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांच्यासोबत आहोत. आम्ही एनडीएचे घटक आहोत. यामुळे घटक पक्ष म्हणून आमची कामं झाली पाहिजेत. तेवढा दर्जा आम्हाला दिलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. परंतु, आम्हाला भाजपकडून फक्त सापत्न सावत्रपणाची वागणूक मिळत आहे. असं कीर्तिकर (Gajanan Kirtikar) म्हणाले.
Gajanan Kirtikar Commented On BJP
दरम्यान, गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी केलेल्या या विधानावरून भाजपमध्ये शिंदे गटाला हवी तशी वागणूक मिळत नसल्याचं दिसुन येत आहे. याचप्रमाणे जागा वाटपाबाबत देखील गजानन कीर्तिकर ( Gajanan Kirtikar) यांनी म्हटलं की, 2029 ला भाजप आणि शिवसेना एकत्र लढली होती. भाजपने 26 जागा घेतल्या होत्या. त्यावेळी त्याचे फक्त 23 खासदार निवडून आले. तर शिवसेनेच्या (Shivsena) 22 जागा होत्या त्यातील 18 खासदार निवडून आले होते. यामुळे
आम्ही आमच्या 22 जागा आहेत त्या लढणार आहोत. असं स्पष्ट मत त्यांनी जागावाटपाबाबत मांडल आहे. आगामी निवडणुक भाजप (BJP) किती शिंदे गटाला किती जागा देणार आणि मंत्री मंडळात किती मंत्र्यांना स्थान मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
- SSC Result | 12 वी नंतर 10 वीचा निकाल कधी आणि कसा बघायचा? जाणून घ्या
- Sanjay Shirsat | “नसबंदी झाल्यानंतर मुलं होत नाही, मात्र संजय राऊतांना…”; संजय शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका
- Kangana Ranaut | कंगना रनौतने शॉर्ट्स घालून मंदिरात गेलेल्या मुलीचे चांगलेचं कान टोचले ; म्हणाली…
- New Parliament House | नवीन संसद भवनाचं उद्घाटन मोदीच करणार, सुप्रीम कोर्टानं फेटाळली ‘ही’ याचिका
- Gautami Patil | मी पाटीलच आडनाव लावणार; गौतमीने मराठा संघटनेला सुनावले खडे बोल
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3WHyBFa