InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

एमआयएमच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी खासदार इम्तियाज जलील यांची निवड

औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांची ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमिन (एआयएमआयएम) या पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने जलील यांच्यावर मोठी जबाबदारी पक्षाने टाकली आहे. इम्तियाज जलील हे एमआयएम या पक्षाचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार आहेत.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एमआयएम पक्षाने ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासह आघाडी तयार करून वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली निवडणुका लढवल्या. महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली. आता विधानसभेलाही एमआयएम व वंचित बहुजन आघाडी एकत्रितपणे सामोरे जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी 60 ते 70 मतदारसंघांवर वंचित आघाडी निवडून येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे जलील यांच्यावरील नवी जबाबदारी महत्त्वाची ठरली आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply