InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

या विधानसभेनंतर महाराष्ट्राला मिळू शकतो उपमुख्यमंत्री; चर्चेला उधाण

महाराष्ट्रात आता राजकीय पक्षांनी विधासभेची तयारी सुरू केली आहे. अशातच गेल्या चार वर्षांपासून नेमल्या न गेलेल्या उपमुख्यमंत्रिपदावरून आता चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत जर शिवसेनेला चांगलं यश मिळालं तर उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे दिलं जाण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास शिवसेनेकडून कुणाला संधी देण्यात येणार, याबाबत मोठी उत्सुकता आहे. याबाबत लोकसत्ता या दैनिकाने वृत्त दिलं आहे.

लोकसभा निवडणुकीचे निकाल अनेक अर्थाने महत्त्वाचे ठरणार आहे. याच निकालानंतर महाराष्ट्राला उपमुख्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे. भाजपने शिवसेनेच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली असली तरी कोणालाही उपमुख्यमंत्री करणं टाळलं आहे. परंतु आता या वृत्तानंतर उपमुख्यमंत्री कोण अशी चर्चा सुरु झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.