Election Commission | गुजरात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणुक आयोगाची पत्रकार परिषद

Election Commission | मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ही निवडणूक चर्चेत येण्याचं आणखी एक कारण म्हणजे आप (AAP) देखील गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलं आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाची (Election Commission) दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद होणार आहे.

या पत्रकार परिषदेमध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेकडं लागल्या आहेत. गेल्यावेळीप्रमाणेच यंदाही दोन टप्प्यांत निवडणुका होऊ शकतात. निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान होऊ शकतं. 2 डिसेंबरला पहिल्या टप्प्यासाठी आणि 5 किंवा 6 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होऊ शकतं. निवडणूक आयोगानं यापूर्वीच हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची घोषण केली आहे. हिमाचल प्रदेशात 12 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंजाबमध्ये आपला मोठं यश मिळालं होतं. सत्ताधारी काँग्रेसला धक्का देत पंजाबमध्ये आपने सत्ता मिळवली. पंजाबनंतर आता आप गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. त्यामुळे आता गुजरातमधील मतदार कोणाला कौल देतात हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.