InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

निवडणूक आयोगाकडून भाजपचे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ आणि बसपाच्या नेत्या मायावती यांच्यावर प्रचारबंदी

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नेत्यांकडून आक्षेपार्ह विधान, शिवीगाळ, धमकवणे अशा गोष्टी वारंवार होताना दिसत आहेत. भाजपच्या उमेदवार जयाप्रदा यांच्यावर अश्लाघ्य शब्दांत टीका केल्यामुळे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान आणि मुस्लिमांना धमकावल्याबद्दल मेनका गांधी यांच्यावरही बंदी आणण्यात आली आहे.

त्यानंतर आता निवडणूक आयोगाकडून  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर 72 तासांची तर बसपाच्या नेत्या मायावती यांच्यावर 48 तासांची बंदी घातली आहे.

मेरठमधील सभेत आदित्यनाथ यांनी मुस्लिमांचा उल्लेख ‘हिरवा विषाणु’ असा केला होता व अलीला नव्हे, तर बजरंगबलीला मते देण्याचे आवाहन केले होते. मायावती यांनी सहारनपूरमध्ये सर्व मुस्लिमांनी या मुस्लीम उमेदवारास मतदान करावे, असे आवाहन केले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.