InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पार्थ पवार यांना पेड न्यूज संदर्भात निवडणूक आयोगाची नोटीस

मावळ लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी आपल्या प्रसिद्धीसाठी पेड न्यूजचा धडाका लावला आहे. ही बाब निवडणूक आयोगाच्या नजरेतून सुटलेली नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने पार्थ पवार यांना पेड न्यूजबाबत खुलासा करण्याबाबत नोटीस पाठवली आहे.

लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्ष, उमेदवार, कार्यकर्ता यांनी आचारसंहितेचा भंग केल्यास निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जात आहे. त्याचप्रमाणे आयोगाकडून उमेदवारांच्या पेड न्यूजवरही बारीक लक्ष आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार हे नवखे आहेत. ते राष्ट्रवादीचे नेते व आमदार अजितदादांचे पुत्र आहेत. मतदारांना सांगण्यासारखे त्यांच्याकडे काहीही नाही. त्यामुळे ते रोज ज्या ठिकाणी जातात, त्याची भरपूर प्रसिद्धी व्हावी या उद्देशाने पेड न्यूजचा धडाका सुरू आहे.

मावळचे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार ‘पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पनवेल विधानसभा क्षेत्र दौरा’ ही बातमी व ‘पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ गाव दौऱ्यांना सुरुवात’ ही एकसारखी बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. या दोन्ही बातम्या पेड न्यूजमध्ये मोडत आहेत. या बातमीचा खर्च उमेदवारांच्या खर्चात समाविष्ट का करू नये असा खुलासा उमेदवारास विचारून कार्यवाहीचा अहवाल माध्यम सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटीला लवकरात लवकर पाठवावा. याबाबत पार्थ पवार यांना नोटीस पाठविण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply