InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

…जेव्हा निवडणूक कर्मचारीच सांगतो ‘या’ पक्षाला मतदान करा

लोकसभा निवडणुकीसाठी आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहेत. उत्तरप्रदेशमध्ये मात्र मतदान करताना विचित्र प्रकार घडला आहे.उत्तरप्रदेशमधील मुरादाबाद मतदान केंद्रावरील कर्मचारीच कोणत्या पक्षाला मतदान करायचे ते सांगत आहे.

मतदान केंद्रावरील एक कर्मचारीच मतदारांना सायकल चिन्हासमोरील बटण दाबण्यास सांगत असल्याचे समोर आले आहे. यावेळी मुरादाबादमधील बूथ क्रमांक 231 मध्ये तैनात असलेल्या निवडणूक कर्मचाऱ्याने मतदारांना समाजवादी पक्षाचे चिन्ह असलेल्या सायकलसमोरील बटण दाबण्याच्या सूचना केल्या. यावेळी हा प्रकार भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी या कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडले आणि पोलिस, निवडणूक अधिकाऱ्यांसमक्ष चोप दिला.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply