InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पश्चिम बंगालमध्ये भाजपची 17 जागांवर आघाडी; ममता दीदींचा गड ढासळला

देशात सर्वात जास्त हिंसाचार झालेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या गडाला खिंडार पडले आहे. 2014मध्ये फक्त 2 जागा असलेला भाजप तिथे 17 जागांवर आघाडीवर आहे. तर तृणमूल काँग्रेस 24 जागांवर आघाडीवर आहे.

2014 मध्ये तृणमूल काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व गाजवत 42 पैकी 34 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला 4, भाजपला 2 तर डाव्या आघाडीला 2 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.

लोकसभेसाठी बंगाली जनतेने विक्रमी मतदान केलं आहे. तृणमूल आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनांनंतरही हे मतदानाचं प्रमाण वाढलं आहे. पश्चिम बंगाल लोकसभेच्या जागांच्या दृष्टीने देशातलं तिसरं मोठं राज्य आहे. लोकसभेच्या 42 जागा इथे आहेत. उत्तर प्रदेशात 80 जागा तर महाराष्ट्रात 48 लोकसभा जागा आहेत. त्या खालोखाल पश्चिम बंगालचा नंबर येतो.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.