नाशिकमधील छगन भुजबळ यांचे वर्चस्व धोक्यात?

दिंडोरीमध्ये भारती पवार आणि  नाशिकमध्ये हेमंत गोडसे या दोन उमेदवारांनी नाशिकमध्ये युतीने विजयाचा झेंडा रोवला. नाशिक जिल्हा आणि शहर कधीकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. इथे भुजबळ कुटुंबीयांचं निर्विवाद वर्चस्व होतं. यामुळे राष्ट्रवादीचा गड मानल्या जाणाऱ्या नाशिकमधून राष्ट्रवादी भुईसपाट झाल्याने भुजबळ यांना हा धक्का मानला जातोय.

दुसरीकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातले नांदगाव आणि येवला हे दोन विधानसभा मतदारसंघ भुजबळांचे हक्काचे म्हणून ओळखले जातात. या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपच्या भारती पवारांना मताधिक्य मिळालंय. नांदगाव आणि येवल्यातला पाणीप्रश्न कायम आहे. त्यामुळे येवला आणि नांदगावमध्ये भुजबळांना पुन्हा निवडून येणंही कठीण झालंय. नाशिकमधल्या पूर्व नाशिक, मध्य नाशिक, पश्चिम नाशिक आणि देवळाली या चार विधानसभा मतदारसंघात भुजबळांना निव्वळ ५० टक्के मतं मिळाली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.