Electric Bike | भारतात लाँच झाली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाइक, सिंगल चार्जरवर देईल 135 किमी रेंज

Electric Bike | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या ट्रेंड दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे लोकांना इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय सर्वोत्तम वाटत आहे. अशा परिस्थितीत अनेक वाहन उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक वाहने बाजारात लाँच करत असतात. याच परिस्थितीचा फायदा घेत हैदराबाद स्थित इलेक्ट्रिक टू व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी Pure EV ने देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाइक लाँच केली आहे. कंपनीने PURE EV EcoDryft ही बाईक बाजारामध्ये सादर केली आहे. ही सध्या देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाइक आहे.

PURE EV EcoDryft या बाइकची एक्स-शोरुम किंमत 99,999 रुपये आहे. या बाईकमध्ये 3.0kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आलेला आहे. हा बॅटरी पॅक AIS 156 प्रमाणीत आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही बाईक एकदा चार्ज केल्यानंतर 135 किमी पर्यंत धावू  शकते.

या इलेक्ट्रिक बाइकच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले, तर ही बाईक बेसिक कम्प्युटर मोटरसायकल सारखी दिसते. यामध्ये अँगुलर हेडलॅम्प, पाच-स्पोक अलॉय व्हील, सिंगल-पीस सीट इत्यादी गोष्टी उपलब्ध आहेत. ही बाईक बाजारामध्ये चार कलरमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये ब्लॅक, ग्रे, ब्लू आणि रेड या रंगांचा समावेश आहे.

PURE EV EcoDryft या इलेक्ट्रिक बाइकमध्ये तीन राईड मोड उपलब्ध आहे. यामध्ये इको थ्रील मोड हा सर्वात वेगवान वेग आहे. या मोडमध्ये ड्रायव्हर 0 ते 40 किमी प्रतितास पाच सेकंदात जाऊ शकतो. तर यामध्ये ड्राईव्ह मोड आणि क्रॉस ओवर मोड सुद्धा उपलब्ध आहे.

महत्वाच्या बातम्या