Electric Car | ‘या’ आहेत भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार

Electric Car | टीम महाराष्ट्र देशा: भारतामध्ये सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा ट्रेंड वाढत चालला आहे. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे लोकांना इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय सर्वोत्तम वाटत आहे. त्यामुळे प्रत्येक वाहन निर्माता कंपनी आपले बेस्ट इलेक्ट्रिक वाहन बाजारामध्ये सादर करत आहे. परंतु जास्त किमतीमुळे लोक इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याची टाळाटाळ करतात. मात्र, बाजारामध्ये परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स देखील उपलब्ध आहे. भारतीय बाजारामध्ये पुढील इलेक्ट्रिक कार कमीत कमी किमतीमध्ये उपलब्ध आहेत.

टाटा टियागो ईव्ही

टाटा टियागो ईव्ही या इलेक्ट्रिक कारमध्ये नेक्सॉन ईव्ही मधील Ziptron EV तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. या इलेक्ट्रिक कारमध्ये 26kWh बॅटरी पॅक उपलब्ध आहे. हा बॅटरी पॅक इलेक्ट्रिक मोटरसह 75PS पॉवर आणि 170Nm टार्क निर्माण करू शकतो. या इलेक्ट्रिक कार 315 किमी रेंज देण्यास सक्षम आहे. या कारची एक्स-शोरुम किंमत 12.49 लाख रुपये आहे.

नेक्सॉन ईव्ही प्राइम

नेक्सॉन ईव्ही प्राइम या इलेक्ट्रिक कारमध्ये 30.2kWh लिथियम आयन बॅटरीपॅक उपलब्ध आहे. हा बॅटरी पॅक इलेक्ट्रिक मोटरसह 129PS पॉवर आणि 245Nm टार्क निर्माण करण्यास सक्षम आहे. ही कार ARAI प्रमाणित 312 किमीची रेंज देऊ शकते. या कारची एक्स-शोरुम किंमत 14.99 लाख रुपये आहे.

टाटा नेक्सॉन ईव्ही मैक्स

टाटाच्या या इलेक्ट्रिक कारमध्ये उपलब्ध असलेली इलेक्ट्रिक मोटर 143PS पॉवर आणि 250Nm टार्क निर्माण करण्यास सक्षम आहे. या कारमध्ये 40.5kWh बॅटरी पॅक उपलब्ध आहे. इलेक्ट्रिक कार ARAI प्रमाणित श्रेणीसह 437 किमी पर्यंत रेंज देण्यास सक्षम आहे. या इलेक्ट्रिक कारची एक्स-शोरूम किंमत 18.34 लाख रुपये आहे.

महत्वाच्या बातम्या