सत्तारांचा दानवेंविरोधात एल्गार, आगामी निवडणुकीत जालन्यातून शिवसेनेचाच खासदार होणार

हिंगोली : गेल्या काही दिवसापासून शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यात शाब्दिक युद्ध चालू आहे. यारून येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून शिवसेनेचाच खासदार होणार असा दावा सत्तार यांनी केला.

यावेळी सत्तार यांनी हिंगोली येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दानवें विरोधात एक प्रकारे एल्गार पुकारल्याचे दिसून आले. सत्तार हे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी ते हिंगोलीत आले होते. पुढे सत्तार म्हणाले की, राज्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी गावपातळीवर जात आहे. त्यातून गावातील समस्या जाणून घेतल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वात जास्त ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपा आघाडीवर राहील असा दावा भाजप करीत आहे. यावर सत्तार म्हणाले, विधान परिषद निवडणुकीच्या वेळीही भाजपने असाच दावा केला होता. मात्र, त्यांना केवळ एकच जागा मिळाली आहे. त्यामुळे त्यांचे दावे किती विश्वासाचे आहेत हे स्पष्ट होते. राज्यातील एकूण ग्रामपंचायतीच्या 15 टक्के ग्रामपंयतीही त्यांना जिंकता येणार नाहीत.

या निवडणुकीच्या मतमोजणी नंतर निवनिर्वाचीत सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा शिवसेनेच्या व्यासपीठावर सत्कार केला जाईल. त्यावेळी शिवसेनेला किती ग्रामपंचायती मिळविता आल्या हे स्पष्टपणे दिसून येईल असेही त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.