Elon Musk | ट्वीटरचा ताबा घेताच एलन मस्कने कंपनीतून काढले निम्मे कर्मचारी

टीम महाराष्ट्र देशा: एलन मस्क (Elon Musk) ने नुकताच ट्विटर (Twitter) चा ताबा आपल्याकडे घेतल्यानंतर सोशल मीडिया (Social Media) वर एक खळबळ सुरू झाली आहे. CEO पराग अग्रवाल आणि पॉलिसी चीफ विजय गड्डे यांना त्यांच्या पदावरून हटवल्यानंतर एलन मस्क आता कंपनीतील कर्मचाऱ्यांना हटवण्याचा तयारीत आहे. एलन मस्क यांच्या सोशल मीडिया कंपनीने शुक्रवारी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणे सुरू केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ट्विटरच्या जवळजवळ 7,500 कर्मचाऱ्यांपैकी निम्म्या कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे. म्हणजेच कंपनी जवळपास 3,738 कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवणार आहे.

एलन मस्क (Elon Musk) यांनी का काढले कंपनीतील कर्मचारी ?

ट्विटरचे प्रमुख एलन मस्क यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. कारण कंपनीला जवळपास दररोज चार दशलक्ष डॉलर्स ( 32 कोंटीपेक्षा जास्त) तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे दुर्दैवाने माझ्याकडे कोणताही पर्याय उरलेला नसून मी कामावरून कर्मचाऱ्यांना काढत आहे. असे एलन मस्क यांनी सांगितले आहे.

मीडिया रिपोर्ट नुसार, एलन मस्क यांनी भारतातील संपूर्ण कम्युनिकेशन आणि मार्केटिंग टीमला काढून टाकण्याची माहिती समोर आली आहे. तर, इंजीनियरिंग, सेल्स आणि पार्टनरशिप टीम वरही या परिस्थितीचा परिणाम झाला आहे. दरम्यान, कंपनीतील 50 टक्के कर्मचारी काढण्यात आले आहे.

याशिवाय कंपनीची कमाई वाढवण्यासाठी एलन मस्क वापरकर्त्याकडून अधिक शुल्क आकारण्याच्या देखील तयारीत असल्याची माहिती समोरून येत आहे. त्याचबरोबर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती व्यक्ती किंवा कंपनीचे वेरिफिकेशन करण्यासाठी दरमहा US$8 शुल्क आकारणार आहे. कारण ट्विटर तोट्यात असल्यामुळे हे कठोर बदल करण्यात येत आहे अशी माहिती एलन मस्क यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.