InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

कर्नाटकात ‘एनआरसी’ लागू करण्याची  खासदार तेजस्वी सूर्यांची मागणी

भाजप खासदार तेजस्वी सुर्या यांनी बुधवारी संसदेत बांगलादेशमधून होत असलेल्या घुसखोरीबाबतचा प्रश्न उपस्थित केला. तसेच कर्नाटक राज्यात नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन (एनआरसी) कायदा लागू करण्याचीही मागणी केली. हा कायदा कर्नाटकात लागू केल्यास बेंगळूरुमध्ये अवैधरित्या वास्तव्य करत असलेल्या बांगलादेशी नागरिकांना बाहेर काढण्यास सोपे जाणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. संसदेत शुन्य प्रहरावेळी ते बोलत होते.

सुर्या म्हणाले, घुसखोरी करून भारतात आलेल्या बांगलादेशी नागरीकांची संख्या कर्नाटक राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. खासकरून बेंगळूरुमध्ये हे घुसखोर अवैधरित्या वास्तव्य करण्यास प्राधान्य देत आहेत. या नागरिकांमुळे राज्याच्या सुरक्षेला धोका पोहचण्याची शक्यता आहे. तसेच या बांगलादेशी नागरीकांकडून भूमीपुत्रांच्या रोजगारावर घाला जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आसामप्रमाणेच कर्नाटकातही नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन (एनआरसी) हा कायदा लागू करावा, जेणेकरून घुसखोर बांगलादेशी नागरिकांना बाहेर काढण्यास मदत होईल. 

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply