Entertainment – InShorts Marathi https://inshortsmarathi.com InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट Tue, 10 Dec 2019 11:29:00 +0530 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=5.3 https://i1.wp.com/inshortsmarathi.com/wp-content/uploads/2018/09/cropped-Inshorts-JPG-1-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 Entertainment – InShorts Marathi https://inshortsmarathi.com 32 32 167515839 आर्चीचा नवा ‘मेकअप’…टीझर प्रदर्शित ! https://inshortsmarathi.com/archies-new-makeup-teaser-on-display/ https://inshortsmarathi.com/archies-new-makeup-teaser-on-display/#respond Tue, 10 Dec 2019 11:29:00 +0000 http://inshortsmarathi.com/?p=89502

नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटातून अभिनयच्या प्रवासाला सुरुवात करणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत रिंकूला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे. या पहिल्यावहिल्याच चित्रपटातून रिंकूने अनेकांच्या मनात घर केले. आता रिंकूचा एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. रिंकूच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘मेकअप’ असे आहे. या चित्रपटात रिंकूसोबत अभिनेता […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. आर्चीचा नवा ‘मेकअप’…टीझर प्रदर्शित ! InShorts Marathi.

]]>

नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटातून अभिनयच्या प्रवासाला सुरुवात करणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत रिंकूला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे. या पहिल्यावहिल्याच चित्रपटातून रिंकूने अनेकांच्या मनात घर केले. आता रिंकूचा एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

रिंकूच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘मेकअप’ असे आहे. या चित्रपटात रिंकूसोबत अभिनेता चिन्मय उदगीरकर देखील दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रिंकू या चित्रपटात दोन वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहायला मिळणार आहे. रिंकूचा हा बिनधास्त अंदाज तसेच तिचा हा ‘मेकअप’ कशासाठी आहे, यासाठी मात्र थोडी वाट पाहावी लागणार आहे. ७ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. आर्चीचा नवा ‘मेकअप’…टीझर प्रदर्शित ! InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/archies-new-makeup-teaser-on-display/feed/ 0 89502
लता दीदींचा ‘हा’ फोटो पाहून वाढेल चिंता… https://inshortsmarathi.com/looking-at-this-photo-of-lata-didi-will-raise-concerns/ https://inshortsmarathi.com/looking-at-this-photo-of-lata-didi-will-raise-concerns/#respond Tue, 10 Dec 2019 11:12:25 +0000 http://inshortsmarathi.com/?p=89492

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर तब्बल 28 दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर रविवारी घरी परतल्या. या 28 दिवसांच्या उपचारानंतर आता लता दीदींचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटो पाहिल्यानंतर सगळ्यांनीच यावर चिंता व्यक्त केली आहे. गेली अनेक दशकं दीदींच्या आवाजामुळे अनेक पिढ्यांचं आयुष्य समृद्ध झालं. त्यामुळे लता दीदी लवकर बऱ्या व्हाव्यात म्हणून देशभर प्रार्थना […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. लता दीदींचा ‘हा’ फोटो पाहून वाढेल चिंता… InShorts Marathi.

]]>

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर तब्बल 28 दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर रविवारी घरी परतल्या. या 28 दिवसांच्या उपचारानंतर आता लता दीदींचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटो पाहिल्यानंतर सगळ्यांनीच यावर चिंता व्यक्त केली आहे.

गेली अनेक दशकं दीदींच्या आवाजामुळे अनेक पिढ्यांचं आयुष्य समृद्ध झालं. त्यामुळे लता दीदी लवकर बऱ्या व्हाव्यात म्हणून देशभर प्रार्थना करण्यात येत होती. 90 वर्षांच्या दीदींवर मुंबईतल्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपाचर सुरू होते. दीदींची प्रकृती आता पूर्ण ठणठणीत झाली असून घरी आल्यानंतर त्यांनी अतिशय भावुक ट्विट करत सगळ्यांचे आभार मानले आहेत.

दीदी म्हणाल्या, गेल्या 28 दिवसांपासून माझ्यावर मुंबईतल्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मला न्यूमोनिया झाला होता. पूर्ण बरी झाल्यानंतरच घरी जावं असं डॉक्टरांनी सांगितं होतं. आज मी घरी आलेय. देवांचे, माई आणि बाबांचे आशीर्वाद, तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा, तुम्हा सगळ्यांचं प्रेम यामुळेच मी बरी झाले. तुम्हा सगळ्यांचे आभार. ब्रीच कँडीमधले उपचार करणारे डॉक्टर हे देवासारखे धावून आलेत. इथला कर्मचारी वर्ग अतिशय चांगला आहे. त्या सगळ्यांचेही आभार. तुमचं प्रेम असचं राहू द्या असं ट्विटमध्ये दीदींनी म्हटलं होतं.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. लता दीदींचा ‘हा’ फोटो पाहून वाढेल चिंता… InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/looking-at-this-photo-of-lata-didi-will-raise-concerns/feed/ 0 89492
…आणि दीपिकाला अचानक रडू कोसळले ! https://inshortsmarathi.com/and-deepika-suddenly-cried/ https://inshortsmarathi.com/and-deepika-suddenly-cried/#respond Tue, 10 Dec 2019 10:58:45 +0000 http://inshortsmarathi.com/?p=89486

‘पिकू’, ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ यांसारख्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री दीपिका पदुकोण ही आता वेगळ्या भूमिकेसाठी सज्ज झाली आहे. दीपिका अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवाची कहाणी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजच ‘छपाक’ या सिनेमाचा ट्रेलर लॉंच झाला. निर्माती म्हणून पदार्पण करणाऱ्या दीपिकासाठी हा एक वेगळा अनुभव होता. या सिनेमाच्या ट्रेलर लॉंच […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. …आणि दीपिकाला अचानक रडू कोसळले ! InShorts Marathi.

]]>

‘पिकू’, ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ यांसारख्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री दीपिका पदुकोण ही आता वेगळ्या भूमिकेसाठी सज्ज झाली आहे. दीपिका अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवाची कहाणी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजच ‘छपाक’ या सिनेमाचा ट्रेलर लॉंच झाला. निर्माती म्हणून पदार्पण करणाऱ्या दीपिकासाठी हा एक वेगळा अनुभव होता.

या सिनेमाच्या ट्रेलर लॉंच दरम्यान दीपिकाला लक्ष्मी अग्रवालच्या भुमिकेबाबत विचारले असता, तिला अश्रु अनावर झाले. आपल्या अनुभवाबाबत सांगताना, “मी जेव्हा जेव्हा हा ट्रेलर पाहते तेव्हा तेव्हा मला अश्रु अनावर होतात. आपल्या देशात आपण पीडितांना चांगली वागणूक देत नाही, त्यांना गुन्हेगारासारखं वागवलं जातं”, असे मत दीपिकानं व्यक्त केले. तसेच, ही भुमिका खास असल्याचेही दीपिका यावेळी म्हणाली.

या सिनेमात अ‍ॅसिड हल्ला पीडितेची व्यक्तिरेखा साकरण्यासाठी दीपिकानं प्रोस्थेटिक्स मेकअपची मदत घेतली होती. या लुकसाठी दीपिकाला तासंतास मेकअप करावा लागत असे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकानं छपाकच्या शूटिंग संपल्यावर शेवटच्या दिवशी तिनं हे प्रोस्थेटिक्स लुक जाळून टाकल्याचा खुलासा केला होता. दीपिका म्हणाली, “मी या प्रोस्थेटिक्सचा एक तुकडा घेतला. अल्कोहोल घेतलं आणि एका कोपऱ्यात नेऊन तो प्रोस्थेटिक्स जाळून टाकला”.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. …आणि दीपिकाला अचानक रडू कोसळले ! InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/and-deepika-suddenly-cried/feed/ 0 89486
दीपिकाचा ‘छपाक’ चित्रपट लवकरच प्रदर्शित https://inshortsmarathi.com/deepikas-chhapak-movie-released-soon/ https://inshortsmarathi.com/deepikas-chhapak-movie-released-soon/#respond Tue, 10 Dec 2019 10:44:22 +0000 http://inshortsmarathi.com/?p=89477

अभिनेत्री दीपिका पदुकोण नेहमीच आपल्या जगावेगळ्या कलाकृतींमुळे चर्चेत असते. आता मात्र दीपिका सर्वांसमोर अंगावर शहारे आणणारी एक कथा घेऊन आली आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता दीपिका पादुकोणचा चित्रपट ‘छपाक’ येत आहे. आजच छपाकचा ट्रेलर रिलीज झाला. दिग्दर्शक मेघना गुलजार यांचा राझीनंतरचा हा आणखी एक दमदार कथानक असलेला चित्रपट आहे. या चित्रपटात दीपिका अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितेची भुमिका […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. दीपिकाचा ‘छपाक’ चित्रपट लवकरच प्रदर्शित InShorts Marathi.

]]>

अभिनेत्री दीपिका पदुकोण नेहमीच आपल्या जगावेगळ्या कलाकृतींमुळे चर्चेत असते. आता मात्र दीपिका सर्वांसमोर अंगावर शहारे आणणारी एक कथा घेऊन आली आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता दीपिका पादुकोणचा चित्रपट ‘छपाक’ येत आहे. आजच छपाकचा ट्रेलर रिलीज झाला. दिग्दर्शक मेघना गुलजार यांचा राझीनंतरचा हा आणखी एक दमदार कथानक असलेला चित्रपट आहे. या चित्रपटात दीपिका अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितेची भुमिका साकारत आहे.

जानेवारी 2018 मध्ये ‘पद्मावत’ मध्ये दीपिका पादुकोण राणी पद्मिनीच्या भूमिकेत दिसली होती. तेव्हापासून तिचे चाहते तिला पडद्यावर पाहण्याची वाट पहात आहेत. त्यानंतर आता वर्षभरानंतर पुन्हा एकदा दीपीका मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ‘छपाक’ ही कथा अ‍ॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 10 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. दीपिकाबरोबच या चित्रपटात विक्रांत मेस्सी प्रमुख भुमिकेत आहे. या चित्रपटातून लक्ष्मी अग्रवालचा संघर्ष उलगडण्यात आला आहे. या चित्रपटासह दीपिका निर्माती म्हणूनही पदार्पण करत आहे.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. दीपिकाचा ‘छपाक’ चित्रपट लवकरच प्रदर्शित InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/deepikas-chhapak-movie-released-soon/feed/ 0 89477
पत्नीचा गाउन सांभाळताना दिसला शाहरुख खान ! https://inshortsmarathi.com/shah-rukh-khan-was-seen-wearing-his-wifes-gown/ https://inshortsmarathi.com/shah-rukh-khan-was-seen-wearing-his-wifes-gown/#respond Tue, 10 Dec 2019 10:27:17 +0000 http://inshortsmarathi.com/?p=89467

सोशल मीडियावर शाहरुख खानचा एक ताजा व्हिडीओ बराच व्हायरल झाला आहे. शाहरुख खानचे फॅन्स हा व्हिडिओ पाहून तो कसा खरा जंटलमन आहे, याचे गोडवे गात आहेत. शाहरुख खान पडद्यावर जशी चॉकलेट हीरो आणि जंटलमनची भूमिका करतो, तसा तो खऱ्या आयुष्यातही आहे, असं म्हणतात. शाहरुख आपल्या पत्नीची, कुटुंबाची कशी काळजी घेतो, याविषयी नेहमी बोललं, लिहिलं जातं. […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. पत्नीचा गाउन सांभाळताना दिसला शाहरुख खान ! InShorts Marathi.

]]>

सोशल मीडियावर शाहरुख खानचा एक ताजा व्हिडीओ बराच व्हायरल झाला आहे. शाहरुख खानचे फॅन्स हा व्हिडिओ पाहून तो कसा खरा जंटलमन आहे, याचे गोडवे गात आहेत. शाहरुख खान पडद्यावर जशी चॉकलेट हीरो आणि जंटलमनची भूमिका करतो, तसा तो खऱ्या आयुष्यातही आहे, असं म्हणतात. शाहरुख आपल्या पत्नीची, कुटुंबाची कशी काळजी घेतो, याविषयी नेहमी बोललं, लिहिलं जातं. पत्नी गौरी खान आणि शाहरुख खान यांचा एक ताजा व्हिडिओ याचीच साक्ष देतो.

सोमवारी शाहरुख खान आणि गौरी एका कार्यक्रमासाठी गेलेले असतानाचा हा व्हिडिओ आहे. प्रसिद्ध बॉलिवूड फोटोग्राफर विरल भयानी यांच्याइंस्टाग्राम अकाउंटवरून तो शेअर करण्यात आला आहे. गौरी खान आणि शाहरुख इव्हेंटसाठी गेलेले असतानाचा हा व्हिडिओ आहे. गौरीने ब्लॅक गाउन घातला होता आणि त्याच्या होलोग्राफिक लाँग स्लीव्ह्ज होत्या. त्या गाउन आणि स्लीव्हजचा मोठा घेरा मागे लोंबत होता. गौरी शाहरुखच्या थोडी पुढे चालत गेली आणि इतरांना त्रास होऊ नये, म्हणून शाहरुखने चटकन गाउन सांभाळून घेतला. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आता हाच व्हिडिओ सगळीकडे फिरत आहे.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. पत्नीचा गाउन सांभाळताना दिसला शाहरुख खान ! InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/shah-rukh-khan-was-seen-wearing-his-wifes-gown/feed/ 0 89467
‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’चा मराठी ट्रेलर रिलीज https://inshortsmarathi.com/marathi-trailer-tanhaji-the-unsung-warrior-ajay-devgn-kajol-saif-ali-khan/ https://inshortsmarathi.com/marathi-trailer-tanhaji-the-unsung-warrior-ajay-devgn-kajol-saif-ali-khan/#respond Tue, 10 Dec 2019 06:54:21 +0000 http://inshortsmarathi.com/?p=89307

ओम राऊत दिग्दर्शित तान्हाजी द अनसंग वॉरिअर या सिनेमाचा मराठी ट्रेलर रिलीज झाला आहे.  अभिनेता अजय देवगणचा हा बहुचर्चित सिनेमा आहे. अजय देवगण तानाजी मालुसरेंची भूमिका साकारत आहे. तर अभिनेता शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. सावित्री मालुसरेंच्या भूमिकेत अभिनेत्री  काजोल आणि उदयभानच्या भूमिकेत सैफअलीखान  आहे.  तानाजी मालुसरेंची ही शौर्यगाथा 3डी मध्ये बघायला मिळणार […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’चा मराठी ट्रेलर रिलीज InShorts Marathi.

]]>

ओम राऊत दिग्दर्शित तान्हाजी द अनसंग वॉरिअर या सिनेमाचा मराठी ट्रेलर रिलीज झाला आहे.  अभिनेता अजय देवगणचा हा बहुचर्चित सिनेमा आहे. अजय देवगण तानाजी मालुसरेंची भूमिका साकारत आहे. तर अभिनेता शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. सावित्री मालुसरेंच्या भूमिकेत अभिनेत्री  काजोल आणि उदयभानच्या भूमिकेत सैफअलीखान  आहे.  तानाजी मालुसरेंची ही शौर्यगाथा 3डी मध्ये बघायला मिळणार आहे.

या चित्रपटात शरद केळकर (छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत), देवदत्त नागे ( सूर्याजी मालुसरे), शशांक शेंडे (शेलारमामा) या मराठी कलाकारांच्या भूमिका आहेत.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’चा मराठी ट्रेलर रिलीज InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/marathi-trailer-tanhaji-the-unsung-warrior-ajay-devgn-kajol-saif-ali-khan/feed/ 0 89307
‘ झी मराठी’ वरील ‘तुझ्यात जीव रंगला ‘या मालिकेतील हा प्रसिद्ध कलाकार अडकला लग्नबंधनात https://inshortsmarathi.com/this-famous-artist-from-the-tujhat-jeev-rangala-is-engaged/ https://inshortsmarathi.com/this-famous-artist-from-the-tujhat-jeev-rangala-is-engaged/#respond Tue, 10 Dec 2019 05:27:03 +0000 http://inshortsmarathi.com/?p=89183

झी मराठीवरीलतुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. रांगडा ‘राणादा’ आणि लाघवी पाठक बाई तर जणू प्रत्येकाच्या कुटुंबाचा भागच बनले. या मालिकेतील सगळेच कलाकार प्रेक्षकांचे प्रचंड आवडते असून त्यांच्या खाजगी आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घ्यायला त्यांच्या चाहत्यांना आवडते. आज […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ‘ झी मराठी’ वरील ‘तुझ्यात जीव रंगला ‘या मालिकेतील हा प्रसिद्ध कलाकार अडकला लग्नबंधनात InShorts Marathi.

]]>

झी मराठीवरीलतुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. रांगडा ‘राणादा’ आणि लाघवी पाठक बाई तर जणू प्रत्येकाच्या कुटुंबाचा भागच बनले. या मालिकेतील सगळेच कलाकार प्रेक्षकांचे प्रचंड आवडते असून त्यांच्या खाजगी आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घ्यायला त्यांच्या चाहत्यांना आवडते. आज आम्ही तुम्हाला याच मालिकेतील एका कलाकाराविषयी एक खास गोष्ट सांगणार आहोत. या कलाकाराचे नुकतेच लग्न झाले असून सोशल मीडियाद्वारे त्याने ही गोष्ट त्याच्या चाहत्यांना सांगितली आहे.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील सनी दा हा प्रेक्षकांचा लाडका असून तो नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. या मालिकेत सनीची भूमिका राज हंचनाळे साकारत असून त्याने इन्स्टाग्रामवर त्याच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे. त्याच्या चाहत्यांनी त्याला सोशल मीडियाद्वारे भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. राजने सहा वर्षांच्या अफेअरनंतर लग्न केले असून त्याची पत्नी ही हरयाणाची आहे. या मुलीचे नाव मौली असून 2013 पासून राज आणि ती एकमेकांना ओळखतात.राज आणि मौली दोघेही या फोटोंमध्ये अतिशय सुंदर दिसत असून त्यांची जोडी खूपच छान दिसत असल्याचे चाहते कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ‘ झी मराठी’ वरील ‘तुझ्यात जीव रंगला ‘या मालिकेतील हा प्रसिद्ध कलाकार अडकला लग्नबंधनात InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/this-famous-artist-from-the-tujhat-jeev-rangala-is-engaged/feed/ 0 89183
कल्कीने केले बेबीबंपसोबत फोटोशूट https://inshortsmarathi.com/kalki-did-a-photoshoot-with-babybumps/ https://inshortsmarathi.com/kalki-did-a-photoshoot-with-babybumps/#respond Tue, 10 Dec 2019 05:09:01 +0000 http://inshortsmarathi.com/?p=89174

लग्नाआधीच प्रेग्नंट असलेली बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलिनने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. नव्या फोटोशूटमधील काही फोटो कल्कीने सोशल मीडियावर शेअर केले असून यात तिचं बेबीबंप दिसत आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत घटस्फोट घेतल्यानंतर कल्की बराच काळ सिंगल होती. गेल्या काही दिवसांपूर्वी तिने गाय हर्शबर्गला डेट करत असल्याची माहिती चाहत्यांना दिली. सोबतच या नात्याची अधिकृत घोषणाही केली. […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. कल्कीने केले बेबीबंपसोबत फोटोशूट InShorts Marathi.

]]>

लग्नाआधीच प्रेग्नंट असलेली बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलिनने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. नव्या फोटोशूटमधील काही फोटो कल्कीने सोशल मीडियावर शेअर केले असून यात तिचं बेबीबंप दिसत आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत घटस्फोट घेतल्यानंतर कल्की बराच काळ सिंगल होती.

गेल्या काही दिवसांपूर्वी तिने गाय हर्शबर्गला डेट करत असल्याची माहिती चाहत्यांना दिली. सोबतच या नात्याची अधिकृत घोषणाही केली. कल्की लग्नापूर्वीच प्रेग्नंट असल्यामुळे अनेकांनी तिला ट्रोल केलं होतं. मात्र या साऱ्याला ती खंबीरपणे सामोरी गेली. तिने केलेल्या नव्या फोटोशूटमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत असून तिच्या चेहऱ्यावर आई होणार असल्याचं आनंद दिसून येत आहे.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. कल्कीने केले बेबीबंपसोबत फोटोशूट InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/kalki-did-a-photoshoot-with-babybumps/feed/ 0 89174
कॉमेडियन कपिल शर्मा झाला बाबा ! https://inshortsmarathi.com/kapil-sharma-blessed-with-baby-girl/ https://inshortsmarathi.com/kapil-sharma-blessed-with-baby-girl/#respond Tue, 10 Dec 2019 04:58:55 +0000 http://inshortsmarathi.com/?p=89173

मुलगी झालीय. तुमचे असेच आशीर्वाद असू द्या…, असे ही बातमी शेअर करताना कपिलने लिहिले. त्याने ही बातमी शेअर करतानाच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. अभिनेत्री रकुल प्रीत सिंग, सायना नेहवाल, गुरु रंधावा, अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आदींनी त्याला शुभेच्छा दिल्यात.गिन्नी आणि कपिल शर्मा १२ डिसेंबर २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. २००७ साली कॉमेडी रिएलिटी […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. कॉमेडियन कपिल शर्मा झाला बाबा ! InShorts Marathi.

]]>

मुलगी झालीय. तुमचे असेच आशीर्वाद असू द्या…, असे ही बातमी शेअर करताना कपिलने लिहिले. त्याने ही बातमी शेअर करतानाच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. अभिनेत्री रकुल प्रीत सिंग, सायना नेहवाल, गुरु रंधावा, अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आदींनी त्याला शुभेच्छा दिल्यात.गिन्नी आणि कपिल शर्मा १२ डिसेंबर २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. २००७ साली कॉमेडी रिएलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिलने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहचला. त्यानंतर त्याने कित्येक शोजमध्ये काम केले.

कॉमेडी सर्कस, झलक दिखला जा ६ व उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगली पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही आणि त्याने कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. या शोला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे.गतवर्षी त्याने गिन्नीसोबत लग्न केले. त्यापूर्वी दीर्घकाळ दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र कपिलने या रिलेशनशिपबद्दल बरीच गुप्तता पाळली होती. अखेर 2017 मध्ये गिन्नीसोबतचा फोटो शेअर करत त्याने हे नाते जगजाहिर केले होते.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. कॉमेडियन कपिल शर्मा झाला बाबा ! InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/kapil-sharma-blessed-with-baby-girl/feed/ 0 89173
‘या’ कारणासाठी सनी लियोनला आवडतो धोनी ! https://inshortsmarathi.com/sunny-leone-likes-dhoni-for-this-reason/ https://inshortsmarathi.com/sunny-leone-likes-dhoni-for-this-reason/#respond Tue, 10 Dec 2019 04:46:46 +0000 http://inshortsmarathi.com/?p=89167

बॉलिवूडची ‘बेबी डॉल’ सनी लियोनला क्रिकेट खूप आवडतं. नुकतंच तिनं एका मुलाखतीत आपल्या आवडत्या क्रिकेटपटूचं नाव सांगितलं. सनीचं क्रिकेट वेड फार कमी लोकांना माहीत आहे. पण तिची क्रिकेटपटूची आवडही एकदम हटके आहे आणि तो क्रिकेटपटू आवडण्यामागचं कारणही तेवढंच गोड आहे. सनीला जेव्हा तिच्या आवडत्या क्रिकेटपटूबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तिनं पटकन महेंद्र सिंग धोनीचं नाव घेतलं […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ‘या’ कारणासाठी सनी लियोनला आवडतो धोनी ! InShorts Marathi.

]]>

बॉलिवूडची ‘बेबी डॉल’ सनी लियोनला क्रिकेट खूप आवडतं. नुकतंच तिनं एका मुलाखतीत आपल्या आवडत्या क्रिकेटपटूचं नाव सांगितलं. सनीचं क्रिकेट वेड फार कमी लोकांना माहीत आहे. पण तिची क्रिकेटपटूची आवडही एकदम हटके आहे आणि तो क्रिकेटपटू आवडण्यामागचं कारणही तेवढंच गोड आहे. सनीला जेव्हा तिच्या आवडत्या क्रिकेटपटूबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तिनं पटकन महेंद्र सिंग धोनीचं नाव घेतलं आणि धोनी का आवडतो या मागचं कारणही तिने सांगितलं.

सनीनं धोनी आवडण्यामागचं सांगिलेलं कारणही खूप सुंदर होतं. ती म्हणाली मला धोनी आवडतो कारण त्याच्याकडे एक खूप क्यूट मुलगी आहे. तो झिवासोबत अनेक फोटो शेअर करतो आणि ते दोघंही एकत्र खूप निरागस वाटतात. सनी पुढे म्हणाली धोनी माझा आवडता क्रिकेटपटू असण्याचं आणखी एक कारण म्हणजे तो एक परफेक्ट फॅमिली मॅन आहे. सनी सध्या दोन टीव्ही शो करत आहे. तसेच तिच्याकडे एक हिंदी आणि साऊथ चित्रपट आहेत. यापैकी हिंदी चित्रपट तिच्या प्रॉडक्शन बॅनरखाली बनत आहे. सनीनं ‘सनी सिटी मीडिया अँड एंटरटेनमेंट’ नावाचं प्रॉडक्शन हाऊस सुरू केलं असून ती निर्माती म्हणून तिच्या जबाबदाऱ्या एंजॉय करत आहे.

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ‘या’ कारणासाठी सनी लियोनला आवडतो धोनी ! InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/sunny-leone-likes-dhoni-for-this-reason/feed/ 0 89167