InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Category

Entertainment

सई आणि अमेयच्या ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांची गोड केमिस्ट्री दाखविणाऱ्या गर्लफ्रेंड या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. जन्मापासून सिंगल असणाऱ्या मुलाला जेव्हा अचानक गर्लफ्रेंड पटते, तेव्हा घडणारी इंटरेस्टिंग गोष्ट या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखविण्यात आली आहे.या चित्रपटात अमेय आणि सईने नचिकेत आणि अलिशा यांची भूमिका साकारली आहे. उपेंद्र सिधये यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर रणजित गुगळे आणि अनिश जोग यांची निर्मिती आहे. सईचा या ट्रेलरमधील लूक हा वाखाणण्याजोगा आहे. तर अमेय ही थोडा…
Read More...

सुरेखा पुणेकर म्हणतात, ‘बिग बॉस झालं आता लढाई विधानसभेसाठी’

बिग बॉस मराठी सिझन 2 मधून सुरेखा पुणेकर बाहेर पडल्यानंतर एका न्यूज चॅनेलने खास बातचीत केली आहे. यावेळी त्यांनी बिग बॉसच्या घरातील अनुभव सांगितले. बिग बॉसच्या घरातून सुरेखा पुणेकरांना कोणत्या गोष्टी शिकायला मिळाल्या? कोणत्या गोष्टी खटकल्या, अंतिम टप्प्यातील दावेदार कोण असेल अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या आहे. मात्र बिग बॉस झालं आता लढाई विधानसभेसाठी असेल असं त्यांनी म्हटलं आहे.सुरेखाताई म्हणाल्या, 'माझा पुढचा बाणविधानसभेत लागलाच पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. मी आज महाराष्ट्रसाठी एवढं केलं.…
Read More...

‘मी हा चित्रपट माझ्या मुलीसाठी आणि तिच्या वयातील प्रत्येक मुलांसाठी साकारला’

'मिशन मंगल’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार शिवाय अभिनेत्री विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, नित्या मेनन, किर्ती कुलहारी आणि शर्मन जोशी अशा एकापेक्षा एक कलाकारांची मेजवानी चाहत्यांना एकत्र अनुभवता येणार आहे.खुद्द अक्षय कुमारने स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. 'मिशन मंगल' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करत कॅप्शनमध्ये,'मी हा चित्रपट माझ्या मुलीसाठी आणि तिच्या वयातील प्रत्येक मुलांसाठी साकारला आहे. मला आशा आहे…
Read More...

अक्षय कुमारच्या ‘मिशन मंगल’ चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

'मिशन मंगल' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार शिवाय अभिनेत्री विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, नित्या मेनन, किर्ती कुलहारी आणि शर्मन जोशी अशा एकापेक्षा एक कलाकारांची मेजवानी चाहत्यांना एकत्र अनुभवता येणार आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये मंगळ ग्रहापर्यंत पोहोचण्याची तयारी आणि त्यामागील खरी गोष्ट चित्रपटाच्या माध्यमातून रेखाटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.https://youtu.be/SPZJFnym8Q0चित्रपटातील प्रत्येक कलाकाराची एक झलक चाहत्यांना टीझरच्या…
Read More...

टिकटॉक स्टार फैझल शेखसह चार जणांवर गुन्हा दाखल

झारखंडमधील मॉब लिचिंगमध्ये हत्या झालेल्या तबरेज अन्सारीसंबंधी व्हिडिओ टिकटॉकवर बनवल्याप्रकरणी मुंबईतील पाच तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्हिडिओत तबरेज अन्सारीच्या हत्येचा उल्लेख असून जर त्याच्या (तबरेजच्या) मुलाने उद्या खुनाचा बदला घेतला तर त्याला दहशतवादी म्हणू नका, असे म्हणत हा व्हिडिओ बनवून अपलोड करण्यात आला आहे. टिकटॉकवर आल्यानंतर अवघ्या काही क्षणांतच हा व्हिडिओ व्हायरल झाला.भारतीय विद्यार्थी सेनेचे संपर्कप्रमुख रमेश सोळंकी यांनी लोकमान्य टिळक नगर पोलीस ठाण्यात दिलेल्या…
Read More...

‘सेक्रेड गेम्स २’चा बहुप्रतिक्षित ट्रेलर ‘बलिदान देना होगा ‘ प्रदर्शित

बऱ्याच किंबहुना अपेक्षेहून  जास्त प्रतिक्षेनंतर आणि उत्सुकता परिसीमेला पोहोचल्यानंतर अखेर ‘सेक्रेड़ गेम्स २’ या नेटफ्लिक्स ओरिजिनल वेब सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पुन्हा एकदा असंख्य प्रश्नांचा काहूर माजवण्याचं काम या ट्रेलरने केलं आहे. त्यामुळे आता कधी एकदा वेब सीरिज प्रदर्शित केली जाते, याचीच उत्सुकता प्रेक्षकांना लागून  राहिली आहे.‘सेक्रेड गेम्स २’च्या ट्रेलरमध्ये गणेश गायतोंडेचं एक वेगळंच रुप पाहायला मिळत आहे. सूट -बूट घातलेल्या ‘गायतोंडे’चा रुबाब पाहता हे सारं नेमकं कसं…
Read More...

महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर या बिग बॉसच्या घरातून बाहेर

महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्या.वीक एंडचा डावमध्ये महेश मांजरेकर यांनी सुरेखा पुणेकर एलिमिनेट झाल्याचे जाहीर केले.'मी सहा आठवडे या घरात राहिले याचा मला अभिमान आहे. घरातील सगळ्यांनी मला जो मान दिला त्यासाठी मी आनंदी आहे' असं त्या म्हणाल्या. या आठवड्यात वैशाली, रुपाली, हीना, किशोरी आणि सुरेखा पुणेकर नॉमिनेशन प्रक्रियेत सहभागी होत्या. त्यापैकी वैशाली आणि सुरेखा पुणेकर डेंजर झोनमध्ये आल्या. आणि त्यातील सुरेखा पुणेकर या एलिमिनेट झाल्या.…
Read More...

संजय दत्तच्या यांच्या बाबा चित्रपटाचं टीझर प्रकाशित

बॉलिवूडमधील आघाडीचा सुपरस्टार संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्त यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आहे. निर्माता म्हणून ‘बाबा’ हा त्यांचा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाची सह-निर्मिती संजय एस दत्त प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली अशोक आणि आरती सुभेदार यांच्या ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’बरोबर केली आहे. ‘ब्ल्यू मस्टँगने याआधी ‘बकेट लिस्ट’ या माधुरी दीक्षितच्या चित्रपटाची निर्मिती केली होती.‘बाबा’ या चित्रपटाचे पहिल्या पोस्टरला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद लाभला…
Read More...

बॉलिवूडचा ‘बाजीराव’ रणवीर सिंगला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बॉलिवूडचा ‘बाजीराव’ रणवीर सिंग याचा आज वाढदिवस. 6 जुलै 1985 मध्ये जन्मलेल्या रणवीरचे खरे नाव रणवीर सिंग भवनानी आहे. बॉलिवूडमध्ये आल्यानंतर रणवीरने आपल्या नावासमोर भवनानी हे सरनेम लिहिणे बंद केले. खरे तर रणवीरला त्याचे नावही बदलायचे होते. कारण रणवीर हे रणबीरसारखे साऊंड करते, असे त्याला वाटायचे. पण नंतर त्याने हा निर्णय बदलला.रणवीर मध्ये लहानपणापासूनच एक अभिनेता बनायची इच्छा मनात बाळगायची त्यासाठी त्याने शाळेत, महाविद्यालयात अभिनय आणि वक्तृत्व स्पर्धेत भाग घायला सुरवात केली नंतर एच आर कॉलेज…
Read More...

जॉन अब्राहमच्या ‘बाटला हाऊस’चा टीझर प्रदर्शित

बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांपासून सत्य घटनांवर आधारित अनेक चित्रपट आले. एखाद्या घटनेबद्दल सामान्य प्रेक्षकांना असलेलं कुतूहल, न ऐकलेली बाजू पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. असाच एक सत्य घटनेवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येत आहे.२००८ साली दिल्लीतील ‘बाटला हाऊस’ चकमक प्रकरणावर आधारलेला चित्रपट ‘बाटला हाऊस’चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेल्या अभिनेता जॉन अब्राहम यानं नुकतीच सोशल मीडियाद्वारे माहिती देत ‘बाटला हाऊस’चं टीझर लाँच केलं…
Read More...