InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ‘पीयूएमटीए’ची स्थापना

- Advertisement -

पुणे : शहर व परिसरातील सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी, वाहतुकीच्या समस्या सोडविण्यासाठी पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाची (पीयूएमटीए) स्थापना करण्यात आली आहे. वाहतुकीशी संबंधित सर्व यंत्रणांच्या समन्वयातून हे प्राधिकरण काम करेल असे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.

- Advertisement -

विधानभवन कार्यालयाच्या सभागृहात प्राधिकरणाची पहिली बैठक प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, पिंपरी-चिचंवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासह महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.

म्हैसेकर म्हणाले,  सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करुन त्यासंबंधीच्या दीर्घकालीन उपाययोजना आणखणे गरजेचे आहे. प्राधिकरणामधे काम करताना वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन देखील घेण्यात येईल.
सौरव राव म्हणाले, महापालिकेची वाहतूक आणि हॉकर्स योजना लवकरच लागू होणार आहे. याशिवाय सायकलींचे शहर अशी ओळख शाहराला पुन्हा प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्नशील राहू.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.