InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

फोडाफोडीचे मंत्रालय स्थापन करून महाजनांकडे कारभार द्या- मुंडे

- Advertisement -

प्रशासकीय आणि पोलीस बळाच्या जोरावर दबाव टाकणे आणि फोडाफोडी करण्यातच सरकारचा वेळ जात आहे. मुख्यमंत्र्यांनी फोडा-फोडीचे मंत्रालय स्थापन करून त्याचा कारभार महाजन यांच्याकडे द्यावा, अशा खोचक शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टिका केली आहे.

विधीमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Loading...

- Advertisement -

विरोधी पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये घेण्यासाठी महाजन नेहमीच प्रयत्नशील असतात. असंही ते या वेळी म्हणाले.

Loading...

सत्तेत येण्यापूर्वी फडणवीस यांनी अनेक आश्वसने दिली होती. त्यापैकी एकही आश्वासन पूर्ण केले नाही. १९७२ पेक्षा भीषण दुष्काळ आहे. या सरकारच्या काळात केवळ आभासी विकास झाल्याचे त्यांनी म्हटले.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.