एवलिन शर्मा ऑस्ट्रेलियन डॉक्टरच्या प्रेमात…

साहो, किस्सेबाज, ये जवानी है दिवानी, यारियां अशा अनेक चित्रपटात झळकलेली अभिनेत्री एवलिन शर्मा सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. होय, एवलिन लवकरच संसार थाटणार आहे. ऑस्ट्रेलियन डेंटल सर्जन आणि उद्योगपती तुशान भिंडी याच्यासोबत एवलिनने नुकताच गुपचूप साखरपुडा उरकला.
गेल्या काही महिन्यांपासून एवलिन तुशानला डेट करत होती. काही दिवसांपूर्वी तुशानने अगदी फिल्मी स्टाईलमध्ये एवलिनला प्रपोज केले होते. एवलिन व तुशान दोघेही सुप्रसिद्ध हॉर्बर ब्रिजवर फिरायला गेले होते. याठिकाणी तुशानने रोमॅन्टिक अंदाजात अगदी गुडघ्यावर बसून एवलिनला प्रपोज केले.

View this post on Instagram

? #flowerchild

A post shared by Evelyn Sharma (@evelyn_sharma) on

एकीकडे तुशान प्रपोज करत होता आणि दुसरीकडे गिटारिस्ट एवलिनचे आवडते गाणे वाजवत होता. जणू चित्रपटात शोभेल असे हे दृश्य होते. मग काय, एवलिनने लगेच होकार दिला आणि नंतर दोघांनीही साखरपुडा उरकला. या स्वप्नवत क्षणाचा फोटो एवलिनने सोशल मीडियावर शेअर केला आहे. येत्या काही दिवसांत हे कपल लग्नबंधनात अडकणार. अर्थात अद्याप लग्नाची तारीख ठरलेली नाही.

View this post on Instagram

Yessss!!! ?????

A post shared by Evelyn Sharma (@evelyn_sharma) on

एका ब्लाइंड डेटवर एवलिन व तुशान पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. ती सांगते, तुशान प्रचंड रोमॅन्टिक आहे आणि माझ्यापेक्षाही फिल्मी आहे. लग्नानंतर ऑस्ट्रेलियात शिफ्ट होणार का, असे विचारले असता, सिडनी माझे आवडते शहर आहे. त्यामुळे इथे शिफ्ट व्हायला मला आवडेल. पण माझे एक घर भारतातही असेल, असे ती म्हणाली.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.