‘इंधनाच्या ‘त्या’ दरात 50 पैसे जरी सूट दिली, तरी केंद्र सरकार विकावं लागेल’

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढतच चालल्या आहेत. यावरूनच देशात आणि राज्यात खळबळ माजली आहे. सामान्य जनतेला महागाईला सामोरी जावं लागत आहे. तसेच या दरवाढीच कारण विचारले असता केंद्र राज्यावर ढकलते आणि राज्य केंद्रावर ढकलते. अशातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वाढत्या दरांबाबत अजब वक्तव्य केलं आहे.

तसेच देशभरात इंधन दरवाढीचा मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात येत आहे. राज्यातही पेट्रोलचे दर ११२ रुपयांवर गेले आहेत, तर डिझेलने शंभरी गाठलीय. त्यामुळे, विरोधकांनी केंद्र सरकारला लक्ष्य करून आंदोलन आणि विविध माध्यमांतून निषेध नोंदवला आहे. महागाईतही इंधन भरणार्‍या वाहनधारकांचा पेट्रोल पंपावरच राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांनी सत्कार करून निषेध केलाय.

चंद्रकांत पाटील यांनी अगोदरही पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं होतं. आता दरवाढीवर बोलताना पाटील म्हणाले की, 100 रुपये जेव्हा पेट्रोल आणि डिझेलचा दर असतो, तेव्हा त्यातील 30 ते 35 रुपये किंमत ही परचेस कॉस्ट असते. त्यामध्ये काहीही सूट देता येत नाही, कारण आपण काही लाख लिटर डिझेल-पेट्रोल वापरतो. त्यामुळे, इंधन दर 50 पैसे जरी कमी केलं तरं केंद्र सरकार विकावं लागेल. पाटील यांच्या या वक्तव्याची राज्यात जोरदार चर्चा होत आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा