चंद्रकांत पाटील पलंगावरून पडले तरी, त्यांना सरकार पडल्यागत वाटत असेल : हसन मुश्रीफ

कोल्हापूर : राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून विरोधी पक्षाकडून नेहमी सांगण्यात येतंय कि, महाविकासाआघाडी सरकार कोसळणार. तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षात सतत शाब्दिक युद्ध चालू असतात. आरोप प्रत्यारोप सुरु असतात. आता यातच राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील वाद सर्वांना माहितीच आहे.

सरकार कोसळणाऱ्या विरोधी पक्षाच्या वक्तव्यांवर हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील पलंगावरून जरी खाली पडले तरी त्यांना महाविकास आघाडीचे सरकार पडले असे वाटत आहे. दोन वर्षे संपत आली. महाविकास आघाडीने अनेक विकासकामे केली. त्यामुळे, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील अस्वस्थ आहेत, असा आरोप मुश्रीफ यांनी केला.

येथील शाहू सांस्कृतिक सभागृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद, सर्व नगरपालिका व पंचायत समितीच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढवणार आहे. कार्यकर्त्यांनी या निवडणुकीसाठी कामाला लागावे, अशा सूचना मुश्रीफ यांनी दिल्या.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा