फडणवीस मुख्यमंत्री असताना पाकिट मारलं तरी बोंबाबोंब करणाऱ्यांना आता गुन्हेगारी दिसत नाही का?

मुंबई : पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरात आठवीत शिकणाऱ्या एका कबड्डीपटूची हत्या करण्यात आली. कोयत्याने वार करत या कबड्डीपटूची निर्घृण हत्या करण्यात आली. प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलीय. बिबवेवाडी परिसरात एका मुलीचा नात्यातील तरुणाने कोयत्याने वार करून खून केला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. क्षितीजा व्यवहारे (वय १४) असे खून झालेल्या मुलीचं नाव आहे.

याबाबत माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनीही तात्काळ या प्रकरणाची दखल घेत आरोपीला शोधण्यासाठी यंत्रणा कामाला लावली. यानंतर अखेर १२ तासांच्या आता या हत्या प्रकऱणातील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

पाटील म्हणाले कि, फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा खुट्ट झालं तरी बोंबाबोंब व्हायची असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा पाकिटमारी झाली तरी बातम्या व्हायच्या. तेव्हा खुट्ट जरी झालं तरी मुख्यमंत्र्यांच्या शहरात पाकिटमारी असं चालायचं. आता नितीन राऊत झोपले का? त्यांना आता गुन्हेगारी दिसत नाही का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा