InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘…तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता’

 ‘छत्रपती शिवाजी महाराज नसते तर पाकिस्तानच्या सीमा तुमच्या दारापर्यंत आल्या असत्या व बाळासाहेब ठाकरे नसते तर हिंदूंनाही नमाज पढावा लागला असता,’ असं म्हणत आजच्या सामना या आपल्या मुखपत्राच्या अग्रलेखातून शिवसेनेनं शिवस्मारकाबाबत आपली भूमिका मांडली आहे.

अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा थांबवले आहे. त्यानंतर शिवसेनेनं आक्रमक होत स्मारकाविरोधात कोर्टात जाणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. ‘महाराष्ट्राच्या दैवतांबाबत कोर्टबाजी करून अडचणी निर्माण करण्याचे दुकान काही मंडळींनी उघडले. मग ते शिवस्मारक असो, नाही तर शिवसेनाप्रमुखांचे स्मारक. अशा स्मारकांची गरज काय? असे प्रश्न विचारले जातात तेव्हा आश्चर्य वाटते,’ असं आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply