‘महापालिका चालवण्याची कुवत नसली तरी स्वप्न मात्र पंतप्रधानपदाचे’, अतुल भातखळकरांचा टोला

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 61 वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या खास शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अखंड साथ आणि अतुट नातं आहे. राष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे. तो दिवस लवकरच उगवेल, असं संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं होत.

प्रत्येकाला आपला कुटुंबप्रमुख मुख्यमंत्री वाटने, हे त्यांच्या नेतृत्वाचं यश आहे. हे नेतृत्व दिर्घकाळ टिकेल. आणि या नेतृत्वाकडून राष्ट्रालाही भविष्यात आपेक्षा आहेत, असं माझं मत आहे. मी पुन्हा एकदा अधोरिखित करतोय की, राष्ट्राला उद्धव ठाकरेंसारखा संयमी, प्रखर राष्ट्रवादी, हिंदूत्ववादी नेतृत्वाची गरज जर भविष्यात जर लागली तर ते नेतृत्व करण्यात सक्षम आहेत आणि ते करतील. याची मला खात्री आहे. या शुभेच्छा मी आज देतोय, असं खासदार संजय राऊत म्हणाले होते.

आता राऊत यांनी केलेल्या विधानाची भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी खिल्ली उडवली आहे. ‘महापालिका चालवण्याची कुवत नसली तरी स्वप्न पंतप्रधानपदाची’ असे ट्विट भातखळकर यांनी केले आहे. कुवत महापालिका चालवण्याची नसली तरी पंतप्रधान पदाची स्वप्न पडू शकतात, स्वप्न बघायला कुठे पैसे लागतात? असा प्रश्न उपस्थित करून भातखळकर यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा