“राज्याला शिक्षणमंत्री किती आहेत हे घरबशा मुख्यमंत्र्यांना देखील माहिती नसावे”

मुंबई : दिवाळीच्या सुट्टीविषयी शालेय शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या दोन वेगवेगळ्या सूचनांमुळे शाळा आणि पालकांचा पुरता गोंधळ उडाला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी शालेय शिक्षण विभागाचे परिपत्रक ट्विट करून २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी असल्याचे जाहीर केले आहे.

तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाकडूनच राज्यातील शाळांना दिवाळीसाठी १ ते २२ नोव्हेंबर अशी सुट्टी देण्यात आली आहे. सुट्टीच्या या दोन वेगवेगळ्या नोटीस समोर आल्याने राज्य सरकारचा सावळा गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. या गोंधळावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले आहेत.

राज्याला शिक्षण मंत्री किती आहेत हे घरबशा मुख्यमंत्र्यांना देखील माहिती नसावे, अशी खोचक टीका अतुल भातखळकरांनी केली आहे. आधीच लॉकडाऊनमुळे शाळा दीड वर्षांपासून बंद होत्या. विद्यार्थ्यांना शाळा आणि शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शिक्षक पालक मोठी मेहनत घेत आहेत. पण सुट्ट्यांच्या या गोंधळामुळे विद्यार्थी पुन्हा गोंधळून गेले आहेत, असं भातखळकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा