“देशमुखांचं उठसूठ समर्थन करणाऱ्या ठाकरे सरकारचंही तोंड काळं झालंय”

मुंबई : १०० कोटीच्या वसुलीप्रकणात राज्याचे माजी गृहमंत्री यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. तो गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका देशमुख यांनी केली होती. अनिल देशमुख आणि महाविकास आघाडी सरकारची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यावरून भाजपनेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

“बारमालकांकडून वसुली करणाऱ्या अनिल देशमुख यांची याचिका फेटाळून हायकोर्टाने त्यांचे कायद्यापासून पळण्याचे मार्ग बंद केले आहेत. देशमुखांचं उठसूठ समर्थन करणाऱ्या ठाकरे सरकारचंही तोंड काळं झालंय. वसुलीबाजांसाठी कोठडीची दारं उघडली आहे,” असं म्हणत अतुल भातखळकरांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

महाराष्ट्र सरकारने पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, बदल्या आणि सचिन वाझे यांच्याबाबतच्या उल्लेखावर आक्षेप घेत तो भाग एफआयआरमधून वगळण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाला केली होती. मात्र न्यायालयाने ही याचिकाही फेटाळून लावली आहे.

“माझ्या विरोधात कोणतेही पुरावे नसताना गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय द्वेषाने हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे,” अशी याचिका अनिल देशमुख यांनी याचिकेमध्ये म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा