“कासवाला सुद्धा लाज वाटेल, अशा गतीने ठाकरे सरकार काम करतंय”

नागपूर : गेल्या काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिह्यातील चिपी विमानतळ उदघाटनाची कार्यक्रम पार पडला. कोकण वासियांसाठी हा खूप मोठा प्रकल्प आहे. आता यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुऱ्यातील मूर्ती या ठिकाणी विमानतळ आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आतापर्यंत हे काम होऊन जायला पाहिजे होते, असं मुनगंटीवार म्हणाले.

पण कासवालासुद्धा लाज वाटेल, अशी गतीने महाविकास आघाडी सरकार काम करीत आहे. तरीही हे विमानतळ आणण्यासाठी शासनाशी संघर्ष करेन आणि हे काम झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार काल म्हणाले. विमानतळ आणण्यासाठी शासनाशी संघर्ष करेल आणि काम झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असंही ते म्हणाले आहेत.

तसेच, डिफेन्स इक्युपमेंट उद्योग लावायचे असतील तर रतन टाटा उद्योग स्थापन करण्यासाठी इच्छुक आहेत, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. राजुरा तालुक्यातील अनुसूचित जाती जमातींचे प्रश्न तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न, महात्मा फुले कर्जमुक्तीचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. हे प्रश्न पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करून सोडवण्यात येतील, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा