साडेतीन जिल्ह्याचा आणि साडेतीन खासदारांचा नेता तरीही यांना पंतप्रधान व्हावं वाटतं

मुंबई : सध्या राज्यातील महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांविरोधात ईडीची कारवाई सुरु आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांची चौकशी सध्या ईडी, आयकर विभाग, एनसीबी किंवा सीबीआय करत आहे. तसेच भाजपा नेते किरीट सोमय्या गेल्या काही दिवसांपासून महाविकासाआघाडीतील नेत्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करत आहे.

यावरूनच सध्या महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरु आहे. यात आता माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी एनसीबी आणि गांजा प्रकरणावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मी पाहिलंय देशात दक्षिणेकडील राज्यात विविध पक्षांकडं 20, 25, 30 खासदार आहेत पण ते कधी स्वत:ला भावी पंतप्रधान म्हणवून घेत नाहीत.

मात्र आपल्या राज्यात साडेतीन जिल्ह्याचा आणि साडेतीन खासदारांचा नेता तरीही यांना पंतप्रधान व्हावं वाटतं, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे. शरद पवार यांना जसं पंतप्रधानपदाचं स्वप्न पडतं तसं मलाही पडावं वाटतं पण स्वप्न पडत नाही, अशी मिश्किल टिप्पणी सुद्धा खोत यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा