‘आज पण राणेंमुळे शिवसेनेत पद मिळतात’, नितेश राणेंचा टोला

मुंबई : राणेंच्या वादग्रस्त विधानानंतर २४ ऑगस्ट रोजी राज्यभर शिवसेनेकडून आंदोलनं आणि निदर्शनं करण्यात आली. यात मुंबईत जुहू येथे नारायण राणेंच्या बंगल्याबाहेर राणे समर्थक आणि युवासैनिकांमध्ये राडाही झाला. पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्जही करावा लागला होता. यात पोलिसांच्या सर्वांत जास्त लाठ्या झेलणारा युवासेनेचा कार्यकर्ता मोहसीन शेख गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आता याच मोहसीन शेखची आक्रमकता बघून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मोठे बक्षीस दिले आहे. मोहसीनची थेट युवासेनेच्या सहसचिवपदी नियुक्ती केली आहे. यावरून आता भाजपचे नितेश राणे यांनी शिवसेनेला चांगलाच टोला लगावला आहे. ‘आज पण राणेंमुळे शिवसेनेत पद मिळतात!’ असे म्हणत त्यांनी युवासेनेला डिवचले आहे.

नितेश राणे यांनी ट्विट केले आहे की, ‘राणेंच्या बंगल्यासमोर मार खाणाऱ्या ‘त्या’ युवासेना कार्यकर्त्याची बढती. आज पण राणेंमुळे शिवसेनेत पद मिळतात. सिर्फ नाम हि काफी है!’ असे म्हणत त्यांनी दोन फोटो पोस्ट केलेत.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा