“सगळे चोर आहेत, फक्त जरंडेश्वरलाच का टार्गेट केलं जातंय?”

पुणे : काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कारखाना घोटाळा प्रकरणी थेट साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याला भेट दिली होती. जरंडेश्वर कारखान्याच्या सभासदांशी चर्चा केल्यानंतर सोमय्यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांना आव्हान दिलं होत. तुमच्यात हिंमत असेल तर कारखान्याचे मालक कोण जाहीर करावे असे सोमय्या यांनी म्हटलं होत.

यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकारपरिषद घेऊन या कारखान्याची संपूर्ण कुंडलीच माध्यमांसमोर मांडत सोमय्यांच्या आरोपांवर उत्तर दिल आहे. ६५ साखर कारखाने महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात विकले गेले तर काही चालवायला दिले गेले आहेत . तसेच ६४ सहकारी साखर कारखाने वेगवेगळ्या कंपनीने विकत घेतल्याची आकडेवारी त्यांनी माध्यमांसमोर मांडली.

अशातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भाष्य केलं आहे. जरंडेश्वर कारखान्यासोबतच आणखी 43 कारखाने आहेत, मग फक्त जरंडेश्वरलाच का टार्गेट केलं जातंय? असा सवाल राजू शेट्टी यांनी किरीट सोमय्या यांना विचारला आहे. आता हे साखर कारखाने शेतकऱ्यांना मिळणार आहेत का?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

गैरव्यवहार झालेल्या कारखान्याची यादी मोठी आहे, हे मी गेल्या 6 वर्षापासून सांगतोय. हे सगळे चोर आहेत, हे सरकार या चोरांना पाठिशी घालण्याचं काम करत आहे, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केली आहे. मी आघाडी सरकारवर नाराज आहे आणि भाजप सरकारवर खूश आहे, असं काही नाही, असंही शेट्टी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा