“देशातील कोणत्याही भागात गेल्यावर चांगले रस्ते दिसतात, लोक म्हणतात गडकरींची कृपा”

अहमदनगर : आज अहमदनगरमध्ये नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रस्ते विकासकामांची भूमीपूजनं तर काही कामांचा लोकार्पण सोहळा पार पडतो आहे. या कार्यक्रमाला मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार सुजय विखे, खासदार सदाशिवराव लोखंडे, आमदार रोहित पवार, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी मंत्री राम शिंदे उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी नितीन गडकरी यांच्या कामाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. देशातील कोणत्याही भागात गेल्यावर चांगले रस्ते पाहायला मिळतात. तेथील लोक सांगतात की, ही सर्व नितीन गडकरींची कृपा आहे, असं म्हणत शरद पवारांनी नितीन गडकरींची स्तुती केली आहे. तसेच त्यांच्या कामगिरीचा उल्लेख करताना आलेला अनुभव देखील त्यांनी उपस्थितांना सांगितला. गडकरींच्या काळात देशातील रस्ते दुप्पट झाल्याचं देखील शरद पवारांनी यावेळी नमूद केलं.

देशाच्या अनेक भागांमध्ये मला कामानिमित्त जावं लागलं. रस्ते चांगले असल्यामुळे गाडीमध्ये प्रवास करताना आनंद मिळतो. रस्ते वाहतुक ही समाजाच्या व्यापक हितासाठी महत्त्वाची असते. नितीन गडकरी यांनी ही जबाबदारी स्वीकारण्याअगोदर 5 हजार किमी रस्ते होते ते आता 12 हजार किमीच्या पुढे गेले आहेत, अशा शब्दात शरद पवारांनी नितीन गडकरींच्या कामाच कौतुक केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा