InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पुन्हा पुलवामा; भारतीय जवानांकडून 3 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून नौशेरा, पुंछ आणि पुलवामा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांकडून सातत्यानं कुरापती सुरू आहेत.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथे काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारे जवानांनी परिसरात शोधमोहीम राबवण्यास सुरुवात केली. गुरुवारी सकाळी जवानांनी दहसतवाद्यांना घेरण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांच्यात चकमक उडाली आणि त्यात 3 दहशतवादी ठार झाले. आणखी दोन दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे. या चकमकीत एक जवान शहीद तर दोन जवान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply