राजकीय वर्तुळात खळबळ ; विश्वास नांगरे पाटील शरद पवारांच्या भेटीला सिल्वर ओकवर

मुंबई : सुरवातीस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर एका महिलेने अत्याचाराचे आरोप केला. यानंतर अंमली पदार्थ पुरवठा प्रकरणात मुंबईतील प्रसिद्ध ‘मुच्छड पानवाला’चा मालक रामकुमार तिवारी याला अटक केली. तर एनसीबीने राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना देखील काल रात्री अटक केली आहे. यामुळे एकापाठोपाठ एक अशा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या अडचणी वाढत आहेत.

यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्याची बातमी समोर आली. २००६ सालापासून धनंजय मुंडे तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते अशी तक्रार ओशिवरा पोलिस ठाण्य़ात रेणू शर्मा या महिलेने केली होती. यानंतर विरोधकांकडून मुंडेंवर टीका आणि त्यांच्या राजीनामा याबाबत वक्तव्य केली जात आहेत.

तर, आता यावर एक वेगळीच गोष्ट समोर आलीय. भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांच्यासह मनसेच्या मनीष धुरी यांनी आपल्याला देखील धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने हनीट्रॅपमध्ये अडकवून ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला पण वेळीच सावध झाल्याने बचावल्याचे सांगत पोलिसांकडे धाव घेतली आहे. यामुळे राजकीय गोटात मोठी खळबळ माजली आहे.

तर, थोड्या वेळापूर्वीच आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांनी पवारांच्या निवासस्थानी सिल्वर ओकवर जाऊन त्यांची भेट घेतलीय. त्यानंतर नांगरे पाटील आता सह्याद्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. यामुळे आता पोलीस काय भूमिका घेणार हे महत्वाचं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.