खळबळजनक ! राखीला भुताने झपाटले, व्हिडीओ पाहून थक्क व्हाल

मुंबई : बॉलिवूडमध्ये रोज आपल्याला नवनवीन गोष्टी पाहायला मिळतात. पण आता जे घडलंय ते वाचून तुम्ही थक्क व्हाल. आपल्या अजब-गजब वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असलेली बॉलिवूडमधील कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

बिग बॉस या शोमध्ये राखी सावंत यावेळी सहभागी आहे. राखीने बिग बॉसच्या घरात खळबळजनक खुलासे केले आहेत. अशातच राखीने आपल्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल काही खुलासे केले आहेत. सध्या ‘बिग बॉस’ १४ मध्ये राखीचे एक वेगळेच रूप पाहायला मिळतेय आणि ते पाहून बिग बॉसच्या घरातील सर्वांना अक्षरश: धडकी भरली आहे.

जास्मीन आणि अर्शीची तर पुरती बोबडी वळलीये. राखीचा बिग बॉसच्या घरातील एक व्हिडीओ समोर आला आहे. यात राखी चित्रविचित्र हरकती करताना दिसतेय. स्वत:ला आरशात बघून ती स्वत:शी बोलतेय. व्हिडीओत, काय तू राखी आहेस? तुला याचबरोबर राहायचे आहे? असे अर्शी तिला विचारते. यावर राखी फक्त मान हलवून हो म्हटले. राखी बाथरूम एरियात स्वत:शी बोलताना पाहून जास्मीन प्रचंड घाबरते.

राखी काय करतेय? असे ती राखीला विचारते. मात्र राखी तिला उत्तर न देता केवळ शून्यात एकटक बघत राहते. 2020 वर्षाबद्दल मी आनंदी नाही. ही माझी जागा आहे, असे बडबडताना ती दिसते. राखीला पाहून सगळेच घाबरले आहेत. राखीला नेमके झाले काय होते हे अद्यापह समोर आलेले नाही.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.