InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

महाराष्ट्रात युतीला 42 पेक्षा जास्त जागा मिळणार – रावसाहेब दानवे

काल लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा पार पडल्यानंतर अनेक वृत्त वाहिन्यांकडून एक्झिट पोल दाखवण्यात आला. अनेक एक्झिट पोलमध्ये एनडीए बहुमताचा आकडा पार करेल, असे अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्रात युतीला 42 पेक्षा अधिक जागा मिळतील, आणि देशात भाजप 300 जागांचा आकडा पार करुन पुन्हा बहुमत मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

रावसाहेब दानवे म्हणाले की, “मी देशाच्या जनतेचे आभार मानतो. अनेक पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान बनण्याचं स्वप्न पाहिलं, कोणी सायकलवर निघालं तर कोणी हत्तीवर पण जनता भरकटली नाही. राज्यभरातल्या सभांमधून लोकांमध्ये उत्साह दिसत होता.”

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply