InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करण्यासाठी एक्झिट पोलची रणनिती, ममता बॅनर्जी यांचा आरोप

लोकसभेच्या अनेक एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत तर भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आता या एक्झिट पोलच्या आकडेवारीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधकांना केले आहे.

व्हीएम मशीनमध्ये फेरफार करण्यासाठी एक्झिट पोलची रणनिती वापरली जात असल्याचा आरोप देखील, ममता बॅनर्जी यांनी ट्विट करत व्यक्त केला आहे.

ममता बॅनर्जी यांनी ट्विट केले की,  मी एक्झिट पोलवर विश्वास ठेवत नाही. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करण्यासाठी ही रणनिती वापरली जाते. मी सर्व विरोधी पक्षांना एकत्र, खंबीर आणि साहसी राहण्याचे आवाहन करत आहे, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply