पश्चिम रेल्वेकडून वातानुकूलित लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या

प्रथम दर्जापेक्षा अधिक भाडे भरून, वाढीव वातानुकूलित लोकलच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. पश्चिम रेल्वेकडून वातानुकूलित लोकलच्या आठ अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे याच महिन्यात या फेऱ्या सुरू होतील. जानेवारी अखेरपर्यंत प्रवाशांची प्रतिक्षा संपणार आहे.

मराठवाड्यासाठी कोकणातून येणार पाणी; मंत्रिमंडळाचा निर्णय

वातानुकूलित लोकलफेऱ्यांबाबत पश्चिम रेल्वेने प्राथमिक अहवाल तयार केला आहे. यानुसार आठपैकी, सकाळी आणि सायंकाळी, गर्दीच्या वेळी प्रत्येकी एक फेरी असणार आहे. तर, उर्वरित सहा फेऱ्या दुपारच्या वेळेमध्ये असतील. पुढच्या दोन आठवड्यांमध्ये अतिरिक्त वातानुकूलित फेऱ्यांचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. चर्चगेट ते विरारदरम्यान या फेऱ्या असतील. पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक जी. व्ही. एल. सत्यकुमार यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.