Eyebrow Care | जर तुम्हाला आकर्षित आयब्रो पाहिजे असतील, तर ‘या’ टीप्स करा फॉलो

टीम महाराष्ट्र देशा: जाड आणि सुंदर आयब्रो (Eyebrow) आपल्या सौंदर्य (Beauty) मध्ये भर घालतात. त्यात काळ्या आणि जाड भुवया (आयब्रो) असेल तर आपल्या चेहरा अधिक आकर्षक दिसायला लागतो. तुमच्या आयब्रो अधिक आकर्षक बनवण्यासाठी बाजारामध्ये अनेक केमिकलयुक्त प्रोडक्ट उपलब्ध आहे. पण अनेकवेळा त्या केमिकलयुक्त प्रॉडक्ट वापर केल्यावर आपल्या भुवयांना धोका निर्माण होऊ शकतो. कारण काही वेळा त्या प्रॉडक्ट्स मधील एलिमेंट्स आपल्या भुवायांना सहन होत नाहीत. त्यामुळे आम्ही आज तुमच्यासाठी भुवायांना आकर्षक बनवण्यासाठी काही घरगुती सोपे उपाय घेऊन आलो आहोत. हे घरगुती उपाय केल्याने तुमच्या भुवया जाड आणि आकर्षक दिसू लागतील.

भुवायांची (Eyebrow) काळजी घेण्यासाठी खालील टिप्स फॉलो करा

भुवयांवर एरंडेल तेलाने मालिश करा

जर तुम्हाला तुमच्या पातळ भुवया जाड करायच्या असतील तर त्यावर तुम्ही नियमितपणे एरंडेल तेलाने मालिश केली पाहिजे. भुवयांवर नियमितपणे एरंडेल तेल लावल्याने तुमच्या भुवया जाड आणि आकर्षित दिसायला लागतील.

भुवायांना व्यवस्थित ब्रश करा

केसांप्रमाणेही भुवयांना ब्रश करण्यासाठी बाजारामध्ये अनेक प्रकारचे ब्रशेस उपलब्ध असतात. त्यांचा उपयोग करून नियमितपणे तुम्ही तुमच्या भुवयांवर ब्रश केला पाहिजे. भुवयांवर सतत ब्रश फिरवल्याने तुमच्या भुवया जाड आणि सुंदर दिसायला लागतील.

थ्रेडिंग करणे टाळा

भुवयांना जाड आणि आकर्षित बनवण्यासाठी भुवयांची सतत थ्रेडिंग करू नका. पण तुम्ही तुमच्या भुवयांना आकार देण्यासाठी काही दिवसातुन एकदा थ्रेडिंग करू शकता.

हे करणे टाळा

तुम्हाला जर तुमच्या भुवया आकर्षक बनवायच्या असतील तर तुम्ही त्यावर वरील उपाय केले पाहिजे. त्याचबरोबर भुवया जाड करण्यासाठी प्लकर किंवा ट्रिमरचा वापर टाळला पाहिजे. कारण त्यांच्या वापराने बुवाची वाढ कमी होऊन गोळ्यांचा आकार बिघडण्याची शक्यता असते. त्याचबरोबर ट्रिमर आणि प्लकर उपयोग केल्याने चेहराही खराब होण्याची शक्यता असते.

टीप : वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.