Face Care Tips | चेहऱ्यावर ग्लो आणायचा असेल तर वापरा ‘हे’ घरगुती फेसपॅक

टीम महाराष्ट्र देशा: फेसपॅक (Facepack) चा वापर करून आपण चेहरा (Face) वर चमकदार आणू शकतो पण त्याचबरोबर चेहऱ्यावरील कोणतीही समस्या दूर करण्यासाठी आपण सर्वप्रथम फेसपॅकचा उपयोग करतो. आपण अनेकदा आपल्या चेहऱ्यावरील समस्या दूर करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले केमिकल युक्त फेसपॅकचा वापर करतो. पण या फेसपॅकचा अनेकदा आपल्या चेहऱ्यावर दुष्परिणाम होताना दिसतो. त्यामुळे चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी किंवा चेहऱ्यावरील समस्या दूर करण्यासाठी घरगुती फेसपॅक चा वापर करावा असा सल्ला तज्ञ देखील देतात. त्यामुळे आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काही घरगुती सोपे आणि फायदेशीर फेस पॅक बनवण्याची पद्धती सांगणार आहोत.

चेहऱ्यावरील Face समस्या दूर करण्यासाठी पुढील घरगुती फेसपॅक लावा

तांदुळाचे पीठ, कॉफी आणि टोमॅटो

तांदुळाचे पीठ कॉफी आणि टोमॅटोला मिक्स करून वापरलेला फेसपॅक कधीही तुमच्या चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. हा फेस पॅक तयार करण्यासाठी सर्वप्रथम तांदळाचे पीठ बारीक करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये तांदळाच्या अर्ध्या प्रमाणात कॉफी पावडर मिक्स करा. हे मिश्रण टोमॅटोच्या साह्याने चेहऱ्यावर लावा. टोमॅटो मधोमध कापून या मिश्रणामध्ये बुडवून टोमॅटोच्या सहाय्याने चेहऱ्यावर मसाज करा. तुम्ही चेहऱ्यावर वर्तुळाकार पद्धतीने पाच मिनिटे मसाज करू शकता. मसाज करून झाल्यावर हे मिश्रण पंधरा मिनिटे चेहऱ्यावर तसेच राहू द्या. पंधरा मिनिटानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा. तुम्ही नियमितपणे या फेसपॅकचा वापर केल्यास तुमची त्वचा चमकायला लागेल आणि तुमच्या त्वचेवरील समस्या देखील हळूहळू कमी होऊ लागतील.

हळद आणि बेसन

सदाबहार फेसपॅक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेसन आणि हळदीचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी आणि चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे. हळद आणि बेसनाचा वापर आपल्या चेहऱ्यावर लावल्यास आपण अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकतो. हळद आणि बेसनाचा फेसपॅक बनवण्यासाठी दोन चमचे बेसन घेऊन त्यामध्ये एक चमचा दही घाला. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मध आणि चिमूटभर हळद मिसळून घ्या. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही दह्या ऐवजी टोमॅटोचा रस यामध्ये मिसळू शकतात. हा तयार झालेला फेसपॅक चेहऱ्यावर लावून त्याला व्यवस्थित सुकू द्या. फेसपॅक सुकल्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. हा फेसपॅक अधिक फायदेशीर बनवण्यासाठी तुम्ही यामध्ये गुलाब जल ही टाकू शकता.

लाल मसूर डाळ

चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी आणि डाग कमी करण्यासाठी मसूर डाळ फेसपॅक चा सर्वाधिक उपयोग होऊ शकतो. मसूर डाळीचा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम लाल मसूर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यानंतर त्याला चाळणीतून गाळून बारीक पावडर काढा. या मसूर डाळीच्या पावडर मध्ये तुम्ही गुलाब जल किंवा साधे कच्चे दूध मिक्स करू शकता. हे तयार झालेले मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर लावा. हे मिश्रण चेहऱ्यावर सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. चेहरा धुताना हळूहळू मसाज करत मसुरीची पेस्ट चेहऱ्यावरून काढा. यापेक्षा नियमित वापर केल्याने तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये फरक जाणवेल.

टीप : वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.