Facebook Instant Article | एप्रिल २०२३ ला फेसबुक इस्टंट आर्टिकल बंद होणार

टीम महाराष्ट्र देशा : फेसबुक संदर्भात एक मोठे अपडेट समोर आले आहे. एप्रिल २०२३ ला फेसबुक इस्टंट आर्टिकल बंद होणार आहेत. फेसबुक मॅनेजरने ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना या माहितीला दुजोरा दिला आहे. त्यामुळे फेसबुकवर अवलंबून असणाऱ्या अनेक डिजिटल मीडियाला याचा मोठा फटका बसणार आहे. फेसबुक इन्स्टंट आर्टिकलमुळे अनेक संकेतस्थळांचा उदर्निवाह चालत होता. दरम्यान इन्स्टंट आर्टिकल बंद करण्याची घोषणा फेसबुकने केली आहे. याचा सोशल माध्यमांवर देखील परिणाम होणार आहे.

इस्टंट आर्टिकल बंद होत असल्यामुळे डिजिटल मीडियासमोर मोठा प्रश्न उभा राहणार आहे. अनेक पत्रकारांनी फेसबुक इस्टंट आर्टिकलच्या मदतीमुळे स्वत:चे वृत्त संकेतस्थळ तयार केले होते. त्यांना आता मोठा फटका बसणार आहे. हे संकेतस्थळ आता फक्त गुगलच्या भरवशावर अवलंबून राहणार आहेत. त्यामुळे फेसबुक काही नवीन अपडेटसह या डिजिटल मीडियाला संधी देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

इस्टंट आर्टिकलमुळे फेसबुक वापरकर्त्याला तात्काळ एखादा लेख, बातमी वाचण्यास मिळत होती. वेगात माहिती देण्यासाठी हे टुल्स काम करत होते. याचा फायदा बातमी प्रसिद्ध करणाऱ्या पेज मालकाला होत होता. फेसबुक त्यासाठी मानधन देत असे. तसेच याचा फटका वाचकांना देखील बसणार आहे. कारण इस्टंट आर्टिकलमुळे बंद होत असल्यामुळे वाचकांना तात्काळ एखादा लेख किंवा बातमी वाचता येणार नाही. फेसबुकवरुन मुख्य लिंकवर जाऊन त्यांना बातमी वाचावी लागेल.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.