पुन्हा एकदा फेसबुक युजर्सचा डेटा लीक; 26.7 कोटी युर्जसचा डेटा लीक

पुन्हा एकदा फेसबुक युजर्सचा डेटा लीक झाल्याची घटना समोर आली आहे. 26.7 कोटी युर्जसचा डेटा लीक  झाला आहे, अशी माहिती सायबर सिक्युरिटी फर्म  आणि रिसर्चर बॉब डियाचेंको यांनी दिली आहे. लीक झालेल्या डेटामध्ये जवळपास 26 कोटी 71 लाख 40 हजार 436 युजर्सचे फोन नंबर, आयडी आणि पर्सनल डिटेल्स लीक झाले आहेत.लीक झालेल्या फेसबुक डेटामध्ये गेल्या दोन आठवड्यातील युजर्सचा डेटा आहे.

हा डेटा पासवर्ड शिवाय अॅक्सेस केला जाऊ शकत होता. तो डाऊनलोड केला जाऊ शकत होता. हे ऑनलाईन हॅकर फोरम एका क्राइम ग्रुपसोबत जोडलेले आहेत. सध्या हा डेटाबेस हटवण्यात आला आहे.

घरबसल्या TikTok वर पैसे मिळवण्याचे ‘हे’ आहे पर्याय

लीक झालेला डेटा किती महत्त्वाचा होता हे अजून स्पष्ट झालेले नाही. युजर्सचा डेटा ऑटोमेटेड बॉट्सच्या माध्यमातून जमा केला होता. यापूर्वीही सप्टेंबरमध्ये 40 कोटी फेसबुक युजर्सचे फोन नंबर लीक झाले होते.या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.