InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

’40 हजार कोटींसाठी फडणवीसांनी 80 तासांचे मुख्यमंत्रीपदाचे केले नाटक’

राज्यात निवडणुकीनंतर रंगलेल्या सत्ता संघर्षात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करून 80 तासात केंद्राचे 40 हजार कोटी रुपये वाचवल्याचा दावा भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी केला आहे.

अनंत कुमार हेगडे यांनी म्हटलं की, तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रात आमचा माणून 80 तासांसाठी मुख्यमंत्री झाला. त्यानंतर फडणवीस यांनी राजीनामा दिली. आमच्याकडे बहुमत नाही हे आम्हाला माहिती नव्हतं का? तरीही ते मुख्यमंत्री का झाले? हे सर्व नाटक त्यांनी का केलं? असे प्रश्न विचारले जात आहेत.

Loading...

फडणवीस यांनी अजित पवार यांच्या पाठिंब्याने शपथ घेतली तेव्हा मुख्यमंत्र्यांकडे केंद्राचा 40 हजार कोटींचा निधी होता. जर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सत्तेत आले असते तर त्यांनी 40 हजार कोटी रुपयांचा गैरवापर केला असता. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावर येऊन त्यांनी केंद्राचा निधी परत पाठवल्याचं खळबळजनक वक्तव्य अनंत कुमार हेगडे यांनी केलं.

- Advertisement -

 

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.