“नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही…”, फडणवीसांची शरद पवारांवर सणसणीत टीका

मुंबई : भाजपला पराभूत करण्यासाठी महाराष्ट्राप्रमाणे गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग व्हावा यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत पुढाकार घेताना दिसत आहेत. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर गोव्यात भाजपाला मोठे धक्के बसत आहेत. भाजपच्या चार आमदारांनी राजीनामा दिलाय. त्यामुळे गोवा प्रभारी असलेले देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

यानंतर देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीच्या हालचालीवरून शरद पवार व त्यांच्या मित्रांना इशारा दिला. गोव्यात राष्ट्रवादीची तृणमूल आणि काँग्रेससोबत बोलणी सुरू आहे, असे शरद पवार म्हणाले होते. तसेच संजय राऊत म्हणाले होते कि, गोव्यात आमची खरी लढाई नोटांशीच आहे. भाजपचे लोक गोव्यात नोटांचा पाऊस पाडत आहेत, विशेषत: महाराष्ट्रातून बॅगा जात आहेत, असा आरोप केला होता.

यानंतर या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.“नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष. राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा करण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी राजकारण करायला गल्लीतच यावे लागते, हेच अंतिम सत्य आहे साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाचं!” असा सणसणीत टोला लगावला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना फडणवीस म्हणालेत की, भाजपा गोव्यात पुन्हा सरकार बनवणार आहे. राहिला प्रश्न अटीतटीच्या लढतीचा, आम्ही कोणतीही निवडणूक सोपी समजत नाही. गोव्यात सगळ्या मोठी अडचण ही आहे की, हे निश्चित होणे बाकी आहे की लढत कोणासोबत आहे. विरोधी पक्ष आपसातच स्वत:ला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. लढत कोणासोबत आहे हे निश्चित झाले तर त्यावर बोलता येईल, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा