फडणवीस आमच्या संपर्कात आहे, ते आम्हालाच मतदान करतील; बच्चू कडूंची खोचक टीका

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्यानं निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे. भाजपचे ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढली आहे. तसेच आता दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. अपक्ष आमदारांची जुळवाजुळव करण्याचं काम महाविकास आघाडी आणि भाजपकडून केला जात आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीनंतर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील अशाच प्रकारचं चित्र आहे. आज मुंबई, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांच्या आपआपल्या गोटात बैठका सुरू पार पडत आहेत. आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान कशा पद्धतीने करावे याबाबतची रंगीत तालीम शिवसेनेच्या आमदरांसाठी पार पडली.

यावेळी बोलताना राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले, आज मतदान कसे करावे याबाबत ट्रायल होती. राज्यसभेत केलेली चूक या निवडनुकीय होऊ नये यासाठी काळजी घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री आमच्याशी उद्या चर्चा करणार आहेत. तर भाजप नेते अपक्ष आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा करत आहे असे विचारल्यावर बच्चू कडू म्हणाले, आम्ही पण संपर्कात आहोत की, देवेंद्रजी आम्हाला कसं मत देतील, तसेच मला पूर्ण विश्वास आहे की देवेंद्रजी आम्हाला मत देतील, असा टोला त्यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा