काँग्रेसला दिलेला शब्द फडणवीसांनी पाळला; राज्यसभा पोटनिवडणुकीतून भाजपची माघार

मुंबई : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. दिवंगत नेते राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर होत असलेल्या निवडणुकीत भाजपने दिलेला उमेदवार मागे घेण्याची विनंती थोरात आणि पटोले यांनी फडणवीसांकडे या भेटीत केली होती.
यानंतर आता भाजप काँग्रेसच्या विनंतीला मान देऊन संजय उपाध्याय यांचा अर्ज मागे घेणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय. एखाद्या राजकीय नेत्याच्या निधनानंतर त्याच्या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत सहसा विरोधी पक्ष आपला उमेदवार देत नाही. त्यामुळेच यावेळी सुद्धा भाजपने आपला उमेदवार मागे घेत राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू होते.
यानंतर आता भाजपनेही काँग्रेसच्या विनंतीला मान देऊन संजय उपाध्याय यांचा अर्ज मागे घेण्याची तयारी दाखवली आहे. यामुळे निवडणुकीतून माघार घेत असल्याचं भाजपने जाहीर करुन काँग्रेसला दिलेला शब्द पाळला आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या रजनी पाटील यांची बिनविरोध निवड होणार आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि मी आम्ही दोघं मित्र आहोत. हे जगजाहीर आहे. तेही सर्वांना सांगतात, मीही सांगत असतो. मित्राला मित्र मिठी मारत नाही तर काय दुश्मनाला मारतात? असा सवाल पटोले यांनी केला. या मिठीचा राजकीय अर्थ काही होऊ शकत नाही. भाजप काँग्रेस दोन तट आहेत. कधीही एकत्र येऊ शकत नाही, असं पटोले म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
- “बारामती हा महाराष्ट्राचाच भाग आपण तो देखील जिंकू”
- “मी जनरल डायरसारखा प्रचार करत पार्थ पवारला पराभूत केलं”
- सरकार कोसळावे म्हणून देव पाण्यात ठेवणारे स्वतःच पाण्यात जातील; वडेट्टीवारांचा पलटवार
- “शिवसेनेने आम्हाला धोका दिला, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा DNA वेगळाच”
- उद्धव ठाकरेंना वाटेल तोपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार टिकेल, शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य