InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

राज्यात पुन्हा एकदा फडणवीसांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीत शानदार विजय मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यानंतर राज्यभर दौरा करण्याची योजना असून बुथ पातळीपर्यंतच जाळं आणखी मजबूत करण्यास भाजपने सुरुवात केली आहे. २०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपचा चेहरा केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच होते. २०१९ मध्ये देखील मोदींच्या अवतीभवतीच निवडणूक पार पडली. याचा भाजपला फायदाच झाला. महाराष्ट्रातही यापेक्षा काही वेगळं चित्र नाही. आगामी विधानसभा निवडणूक देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभवतीच फिरणार असं दिसत आहे.

मागील पाच वर्षांत फडणवीस यांच्या मुत्सदी राजकारणामुळे भाजपमधून मुख्यमंत्रीपदासाठी दावेदारी सांगणारा एकही नेता समोर आलेला नाही. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षातून बेदखल झाले आहे. त्यामुळे राज्यात फडणवीसच भाजपचा चेहरा असतील, अशी शक्यता आहे.

२०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाटेनंतर राज्यात झालेल्या निवडणुकीत सत्तांतर झाले. मात्र त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठीच्या इच्छूकांची यादी भली मोठी होती.

 

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply