मराठा आरक्षणाच्या मुद्यावर संकुचित आणि राजकीय विचार करण्याची मानसिकता फडणवीसांनी सोडून द्यावी!

मुंबई : गेल्या अनेक दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने महत्त्वाचा निर्णय घेऊन 102 व्या घटना दुरूस्तीचा प्रस्ताव मान्य केला आहे. त्यामुळे एखाद्या जातीला मागास ठरवून तिला आरक्षण देण्याचा राज्यांचा अधिकार केंद्र सरकारने मान्य केला आहे. याबाबत संसदेत विधेयक मंजूर केलं जाईल.

यानंतर आता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. यानंतर या सगळ्या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्याला अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपची सत्ता नाही म्हणून राज्यात असंतोष निर्माण करण्याऐवजी देवेंद्र फडणविसांनी मराठा आरक्षण सुरक्षित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. आरक्षणाचा मार्ग सुकर झाला तर त्याचं श्रेयही त्यांनीच घ्यावं. पण मराठा आरक्षणाच्या मुद्यावर संकुचित आणि राजकीय विचार करण्याची मानसिकता सोडून द्यावी, असं अशोक चव्हाण म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा