“फडणवीस पुण्याचे शिल्पकार, यापेक्षा मोठा जोक असू शकत नाही; धन्य ते नेतृत्व आणि धन्य त्यांचे अंधभक्त”

पुणे : राज्यात या ना त्या कारणावरून राजकारण झालेले आपल्याला दिसून येते. आता होर्डिंगवरून राजकारण केलेले पहायला मिळत आहे. आता एका होर्डिंगवरून विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल करण्यात येत आहे. पुण्यात देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे मोठे होर्डिंग लावण्यात आले आहेत. त्यातील एका होर्डिंगवर नव्या पुण्याचे शिल्पकार, म्हणून फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे फडणवीस यांच्यावर टीका होत आहे.

यानंतर यावर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. पुण्यातील देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा देणारं आहे. त्यावर मोठ्या एका कॅप्शनवरुन अमोल मिटकरींनी टीका केली आहे. त्या कॅप्शनमध्ये फडणवीसांना पुण्याचे शिल्पकार असा उल्लेख केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

आता कमाल झाली. चक्क पुण्याचे शिल्पकार मला वाटतं यापेक्षा दुसरा मोठा जोक असु शकत नाही. धन्य ते नेतृत्व आणि धन्य त्यांचे अंधभक्त, असं अमोल मिटकरी यांना आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. अमोल मिटकरींनी लगावलेल्या टोल्यावरून भाजप काय प्रत्युत्तर देतं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा